Corona News Update: कोरोनाचा धोका संपला असला तरी  कोरोनाचे विपरीत परिणाम अजूनही दिसून येतात. आता कोरोनाची पहिली लाट येऊन तब्बल चार ते पाच वर्षे उलटून गेली. तरीही कोरोना काळातील धक्कादायक गोष्टी अजूनही ऐकायला मिळताय. अशाच एक कोरोना काळातील धक्कादायक प्रकार समोर आला असून छत्तीसगडमधील रायपूरमधून ही घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या लाटेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांच्या मृतदेहांवर आता अंतिम संस्कार केले गेले. तेव्हापासून हे मृतदेह रायपूरच्या मेखरा रुग्णालयात पडून आल्याचे समोर आले आहे. पाच वर्षानंतर या तीन मृतदेहाचे रूपांतर अक्षरश:  सांगाड्यात झाले होते. याबाबतची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. गौरव सिंह यांच्या सूचनेनुसाक कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांच्या मृतदेहांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले, ते रायपूरच्या मेखरा रुग्णालयात पडून होते. पहिल्या लाटेतच या तीघांचा मृत्यू झाल्यांची माहिती मिळत आहे. या घटनेबाबत येथे राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत या मृतदेहाचे सांगाडेच राहिले होते. 


रायपूरच्या मेखरा रुग्णालयात गेल्या साडेतीन वर्षांपासून कोरोना रुग्णांचे मृतदेह पीपीई बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. हे रुग्णालय राज्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयांपैकी एक आहे. येथे दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अशा स्थितीत त्यांच्या प्रकृतीबाबतह निष्काळजीपणा होत होता. अंत्यसंस्काराच्या वेळी य  मृतदेहाची स्थिती इतकी भयावह होती की, मृतदेह पुरुषांचा आहे की महिलांचा, हे कळणे कठीण झालं होतं. 


कोरोनाच्या काळात मृत झाल्याने यांचे मृतदेहांचे शवविच्छेदन झाले नाही. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा विचारणा केली असता, त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नव्हते असं सांगितले. माहिती मिळाल्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. गौरव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या तीन जणांवर देवेंद्र नगर मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी मृतांच्या नातेवाइकांची परवानगी घेण्यात आली त्यानंतर त्यानंतर अंतिम संस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली. कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, मेखरा, पोलीस विभागाचे सदस्य उपस्थित होते.