मुंबई : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ इमोशनल असतात. बऱ्याच लग्नामध्ये घोडे नाचवण्याची पद्धत असते. घोडे नाचवतानाचा घडलेला एक मजेशीर प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तरुणाला घोड्याशी डान्स करण्याची स्पर्धा करणं खूप महागात पडलं आहे. या तरुणाला आयुष्यभराची अद्दल घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुण घोड्यांसोबत डान्स करत असतो. त्यांच्याशी स्पर्धा करायला जातो तोच एक घोडा नाचता नाचता त्याच्या कंबरेत लाथ घालतो.


घोड्याने लाथ मारल्याने हा तरुण हवेत उडून खाली पडतो. या तरुणाला चांगलीच दुखापत झाली असणार असं हा व्हिडीओ पाहून तरी वाटत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. पण अशी घोड्याशी स्पर्धा करायला जाणं जीवावर बेतू शकतं हे देखील ह्या व्हिडीओमधून दिसत आहे. 



iam_a_dreamer_5 नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 8 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहे.