Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लग्नातील सजावट लोकांच्या लक्षातच आली नसल्याचं यातून दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. लग्नात वऱ्हाडी मंडळी हातात जेवणाच्या प्लेट घेऊन उभे आहेत. तिथेच सुशोभिकरणासाठी कारंज लावण्यात आहे. पण लग्नात आलेल्या काही लोकांना याबाबत काहीच माहिती नसल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात आलेले काही पाहुणे आपली ताटं कारंज्यात धुताना दिसत आहेत. ही कारंज त्यासाठीच लावल्याची त्यांची समज आहे. व्हिडीओ एका गावातील असल्याचं नेटकरी सांगत आहे. या व्हिडीओखाली नेटकरी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. हा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.



Burning Railway Track: रुळावर दूरपर्यंत लागली होती आग, हायस्पीड ट्रेन आली आणि...


23 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.