या व्यवसायातून दरवर्षी 6 लाख रुपये कमवण्याची संधी, 80% भांडवल केंद्र सरकारच्या योजनेतून
मुलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाच्या गरजा वाढतात आणि मग तो. त्याचा पुढचा विचार करु लागतात
मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसांच्या तीन मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे माणसाला या गोष्टींची गरज ही लागतेच. परंतु या मुलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाच्या गरजा वाढतात आणि मग तो. त्याचा पुढचा विचार करु लागतात आणि माणसांच्या गरजा संपून त्याच्या इच्छा आणि बाकिच्या गोष्टींचा समोवेश होतो. जसे लोकांना घर मिळाल्यानंतर ते लोकं त्या घरात लागणाऱ्या वापरांच्या वस्तू शोधू लागतात जसे की, बेड, टेबल, खुर्ची, कपाट इत्यादी.
त्यामुळे या वस्तूंची मागणीही भरपूर आहे. कारण घरा बरोबरच कार्यालयात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लाकूड, कुंडी किंवा कोरीव काम करून बनवलेल्या अशा बर्याच गोष्टींचा वापर होतो. याची मागणी भविष्यात देखील राहाणार.
त्यामुळे अशा गोष्टींचा व्यवसाय करून लोकं चांगले पैसे कमवू शकतात. त्यामुळे फर्निचर व्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे. यात चांगली गोष्ट अशी की, मोदी सरकार या योजनेसाठी लागणारा 80 टक्के खर्च मुद्रा योजनेंतर्गत देत आहे.
भारतातील फर्निचरचे उत्तम काम केरळ राज्यात केले जाते. अनेक शतकांपासून येथे या प्रकारचे काम करण्याची परंपरा सुरू आहे. सागवान, अंजली, रोजवुड, शीशम यांच्यासह इतर अनेक प्रकारच्या लाकडापासून फर्निचर बनविलेले जाते.
फर्निचर मार्केटमध्ये बरेच काही निश्चित ब्रांड्स किंवा कंपन्या असल्याने आणि त्याची मागणी 12 महिने असते. म्हणून हा व्यवसाय सुरू करणे लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. बांधकाम आणि गृहनिर्माण उद्योग जसजसे विस्तारत जाईल तसतसे लाकडी फर्निचर आणि लाकडी बांधकाम साहित्यांची मागणी वाढत जाईल. लोक बाजारात यासाठी मोठी किंमत देण्यास तयार आहेत. हे ऑनलाइन बाजारात देखील विकले जाऊ शकते.
उत्पादन प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे. कोणतीही फर्निचर तयार करण्यासाठी प्रथम लाकूड त्याचा प्रकार आणि आकाराच्या आधारे निवडला जाते. यानंतर ते कापून स्वच्छ आणि गुळगुळीत केले जातात. वार्निश / पेंट नंतर हवे असल्यास आपण लॅमिनेशन शीटसह लॅमिनेट देखील करू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येईल?
फर्निचर व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम फिक्स कॅपिटलवर काही पैसे खर्च करावे लागतील. यामध्ये भाड्याने घतल्या जाणाऱ्या जागेचा देखील समावेश आहे. आपल्याकडे आपली स्वतःची जागा असल्यास, भाडे खर्च वाचवला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त काही मशीन्स, मोटर्स आणि गोष्टींची आवश्यकता आहे.
केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेच्या प्रकल्पानुसार या व्यवसायासाठी यंत्रणा आणि उपकरणांवर 3,55,000 रुपये खर्च येतो. याशिवाय वीज शुल्क स्वतंत्रपणे द्यावे लागेल.
लाकूड, प्लेन ग्लास, फेविकॉल, प्लाय, सनमायका आणि कामगारांच्या वेतनात हे सर्व वर्किंग कॅपिटल आहे. यात तुम्हाला दरमहा सुमारे 1,90,250 रुपये खर्च येतो.
अशा प्रकारे, जर आपण पहिल्या तीन महिन्यांसाठी निश्चित भांडवल आणि कार्यकारी भांडवल जमा केली, तर आपल्याला एकूण 9,35,750 रुपये खर्चे येईल.
निधी कोठून येईल?
आता व्यवसायाचा संपूर्ण प्लॅनींग झाल्यानंतप इतके पैसे कुठून उभे करायचे हा प्र्न येतो. तर स्वतःचा फर्निचर व्यवसाय उघडण्यासाठी या प्रकल्पाच्या रकमेपैकी 20 टक्के रक्कम तर तुम्हाला स्वतःच गुंतवावी लागेल.
वरील खर्चानुसार ही रक्कम 9,35,750 रुपये आहे. तर मुद्रा मुद्रा योजनेंतर्गत तुम्ही उर्वरित रकमेचा 80 टक्के म्हणजेच कोणत्याही बँकेकडून 7,48,600 रुपये कर्ज घेऊ शकता.
वार्षिक उत्पादन खर्च किती असेल?
या व्यवसात वार्षिक उत्पादन खर्च सुमारे 24 लाख 27 हजार 582 रुपयांपर्यंत होतो. यात कच्चा माल, कामगारांचे वेतन, इतर किरकोळ खर्च, यंत्रसामग्रीची किंमत आणि बँक कर्जाचा हप्ता 12 टक्के दराने समाविष्ट आहे.
उलाढाल किती असेल आणि किती फायदा होईल?
जर आपण एका वर्षामध्ये 100 फर्निचर कोट्स, 70 खिडक्या, 90 दरवाजे आणि 60 खुर्च्या बनवल्या तर अनुक्रमे 12 हजार रुपये, 7 हजार, 10 हजार आणि 7 हजार रुपये प्रति पिसने विकल्यास तुमचे वार्षिक उलाढाल सुमारे 30 लाख 10 हजार रुपये असेल. जर वार्षिक उत्पादन खर्च 24 लाख 27 हजार 582 रुपये पकडला, तर एका वर्षाचा तुमचा एकूण नफा 5,82,418 रुपये असेल.