नवी दिल्ली : आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची आज 150 वी जयंती आहे. याच निमित्तानं देशभरात राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात येतंय. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं आज देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. दिल्लीतील राजघाटावर गाधींजींच्या समाधीस्थळी पहाटेपासून सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्तानं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आज दुपारी सव्वा अकराच्या सुमारास सेवाग्रामला पोहचणार आहेत. सेवाग्रामला दाखल झाल्यानंतर ते थेट सेवाग्राम आश्रमात दाखल होतील. तिथे बापु कुटीत जावून नमन केल्यानंतर प्रार्थनासभेत सहभागी होतील. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह व काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेतेच आश्रमात उपस्थित राहणार आहे. 


त्यानंतर राहुल गांधी कार्यकारिणीच्या बैठक असलेल्या सर्वसेवा संघाच्या महादेव  स्मारक भवनाकडे रवाना होतील. दुपारी साडे बारा ते दोनच्या सुमारास केंद्रीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक तिथे पार पडेल. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास ते पदयात्रेकरता रवाना होतील जिल्हाधिकारी कार्यलयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात होईल


तर दुसरीकडे, सकाळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. त्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गाधीजींना पुष्पांजली अर्पण केलीय. पंतप्रधानांनी ट्विटरवर राष्ट्रपित्याला शतशः प्रणाम केलाय. 


नागपुरातही महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पदयात्रेस सुरुवात झाली असून छत्रपती चौकातून सुरू झाली पदयात्रा सुरू झाली.