उत्तराखंड : गणेशोत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. पुढचे दहा दिवस सगळीकडे जल्लोष आणि उत्साह बघायला मिळणार आहे. सर्वांच्या लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने सर्वांना आनंद झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीगणेशाच्या मनोहारी हत्तीमुखाची माहिती सर्वांनाच आहे. तेव्हा काय झाले होते हेही सर्वांना माहिती आहे. पण अनेकांना हा प्रश्न पडत असेल की, श्रीगणेशाचे भगवान शंकराने कापलेले शीर कुठे आहे? चला जाणून घेऊया.


असे म्हणतात की, रागाच्या भरात भगवान महादेवाने गणेशाचे शीर धडापासून वेगळे केले होते. नंतर माता पार्वतीच्या सांगण्यावरून महादेवाने गणेशाला हत्तीचे मुख लावले होते आणि जे शीर शरिरापासून वेगळं केलं होतं ते एका गुहेत ठेवलं होतं. उत्तराखंडच्या पिथोरागढ जिथे पाताळ भुवनेश्वर नावाची एक गुहा आहे. ही गुहा अनेक रहस्यांसाठी ओळखली जाते.


असे म्हणतात की, आजही या गुहेत असे काही सत्य जिवंत आहेत, जे मनुष्याला विचार करायला भाग पाडतात. असेही म्हटले जाते की, भगवान गणेशाचं तोडलेलं शीर याच गुहेत ठेवण्यात आलं आहे. आजही हजारो भाविक ते बघण्यासाठी इथे येतात. 


पाताळ भुवनेश्वर गुहेत श्री गणेशाच्या शीरावर १०८ पाकळ्या असलेलं कमळ तयार झालं आहे. त्या कमळातून पाण्याचे थेंब गणेशाच्या डोक्यावर पडतात. असे म्हणतात की, हे कमळ ब्रम्हदेवाचं आहे. जे स्वत: महादेवाने इथे ठेवले होते. याबाबतची माहिती स्कंदपुराणात सांगितली आहे.


याबाबतच्या सत्यतेबद्दल कुणाकडे काहीच उत्तर नाहीये. मात्र, अनेक वर्षांपासून आजही भाविक इथे मोठ्या आस्थेने दर्शनासाठी येतात. गणेशोत्सवादरम्यात इथे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते.