Indian Himalaya : पृथ्वीवरच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या आणि बर्फाचे थर वितळत आहेत. त्यामुळे भारतासाठी महत्त्वाच्या असणा-या गंगा, ब्रम्हपुत्रा, सिंधू नद्या संकटात आल्या आहेत.  हिमालयातील भौगोलिक हालचालींचा मोठा फटका भारतातील या प्रमुख नद्यांना बसणार आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात   ISRO ने याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमालायातील हिमनद्या वेगानं वितळू लागल्याने निर्माण झालेय धोकादायक स्थिती


हिमालयातील पर्वत रांगा या जगाचा तिसरा ध्रुव  (Third Pole) म्हणून ओळखल्या जातात.  हिमालायातील हिमनद्या वेगानं वितळू लागल्या आहेत. यामुळे हिमालयातील तलावांची संख्या आणि त्यातील पाण्याची पातळी धोकादायक स्तरापर्यंत वाढू लागली आहे. यातील अनेक तलाव भारतातील प्रमुख नद्यांसाठी धोकादायक ठरणार आहेत. अनेक तलावांतील पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं पूराचा धोका निर्माण झाला आहे.  नेपाळ, चीन, आणि भारतातील काही भागांना या पुराचा तडाखा बसेल असा इशारा संशोधकांनी आधीच दिला आहे. संशोधकांच्या अभ्यासासुनार 30 वर्षात हिमनद्या वितळ्याचं प्रमाण दुपटीहून अधिक झाले. त्यामुळे धोकादायक सरोवरांची संख्या 50टक्यांहून जास्त झाली आहे. हिमनद्या आकुंचन पावत आहेत. हिमनद्या आणि बर्फ हे भारतातील नद्यांचे उगमस्थान आहेत. पण हे बर्फ वितळू लागल्याने हिम तलाव धोकादायक ठरू शकतात. हिम तलावांमुळे ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड्स (GLOFS) चा धोका निर्माण होत आहे. केदारनाथ, चमोली आणि सिक्कीममध्ये हिमसख्खलन झाले. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांना पूर आणि भूस्खलनाचा धोका आहे. 


हिमालयातील हिमतलावांचा आकार सातत्याने वाढतोय


हिमालयातील हिमतलावांचा आकार सातत्याने वाढत आहे. हा भारतासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. हिमतलांच्या बदलत्या आकाराबाबत आकडेवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1984 ते 2023 पर्यंतची आकडेवारीवर नजर टाकली असता हिमालयात 2431 तलाव आहेत. ज्यांचा आकार 10 हेक्टरपेक्षा मोठा आहे. तर 1984 पासून आत्तापर्यंत 676 तलाव आहेत ज्यांचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्यापैकी 130 भारतात आहेत. सिंधू नदीवर 65, गंगा नदीवर सात आणि ब्रह्मपुत्रेवर 58 नव्या हिमनद्या  तयार झाल्या आहेत.


1984 ते 2023 पर्यंतची आकडेवारी पाहिली तर आपल्याला असे आढळून येते की हिमालयात 2431 तलाव आहेत, ज्यांचा आकार 10 हेक्टरपेक्षा मोठा आहे. तर 1984 पासून आत्तापर्यंत 676 तलावांचे  क्षेत्रफळ वाढले आहे. त्यापैकी 130 भारतात आहेत. सिंधू नदीवर 65, गंगा नदीवर सात आणि ब्रह्मपुत्रेवर 58 हिमनदी तयार झाल्या आहेत.   


ISRO ने दिला धोक्याचा इशारा


हिमाचल, उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.  ISRO  उपग्रहांद्वारे हिमालयातील हिमतलावांवर लक्ष ठेवून आहे. जेणेकरून धोकादायक हिमनदी तलाव फुटण्यापूर्वी लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करता येईल. किंवा हे टाळण्यासाठी काही उपाय शोधता येतील. भारताकडे हिमालयातील हिमनदी सरोवरांचा 3 ते 4 दशकांची डेटा उपलब्ध आहे. या उपलब्ध डेटाच्या निरीक्षणाच्या माध्यमातून  ISRO  भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात असल्याची माहिती दिली आहे.