Crime News : भावाला राखी बांधायला जात असताना एका अल्पवयीन मुलीवर चौघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्या कार चालकाने गाडी थांबवत तिला रूग्णालयात दाखल केलं. (Four People gangrape in Bihar Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
पीडिता तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी जात होती. मात्र त्यावेळी चौघा तरूणांनी तिचं अपहरण केलं, त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.  बलात्कार होत असताना पीडित मुलगी मोठ-मोठ्याने ओरडत होती. त्यावेळी रस्त्याने एक स्कॉर्पिओ कार जात होती. 


स्कॉर्पिओ कार चालकाला मुलीचा आवाज आल्यावर तो झाडीच्या दिशेने गेला. नराधम मुलीवर बलात्कार करत होते त्यांना कोणीतरी येत असल्याची चाहुल लागल्यावर तिथून ते फरार झाले. कार चालकाने त्यानंतर पीडितेला रूग्णालयात दाखल केलं. 


पीडितेची अवस्था एकदम नाजूक तिच्या प्रायव्हेट पार्टलाही जखम झाली आहे. पोलिसांनी पीडितेला कस्टडीमध्ये ठेवलं असून तिच्यासोबत कोणालाही बोलू दिलं जात नाही. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.


दरम्यान, पीडितेने सांगितलेल्या नावांनुसार पवन कुमार, अंकित कुमार, इमामुद्दीन, दिनेश कुमार यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. ही घटना बिहारमधील सिवान इथली आहे.