सलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... `हे` आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोर
Lawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Lawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrece Bishnoi) गुजरातमधल्या साबरमती तुरुंगात बंद आहे. पण त्याच्या इशाऱ्यावर बिश्नोई गँगमधील गुंड गुन्हे घडवून आणत आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) अनेक प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करत आहेत. नुकतंच एनआयएच्या चौकशीत लॉरेन्सने त्याच्या 5 टार्गेट्सबाबत खुलासा केला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
टार्गेट नंबर-1: सलमान खान
एनआयएच्या तपासात लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान (Salman Khan) आपल्या टार्गेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं होतं. काळविट हत्याप्रकरणात सलमान खानचं नाव समोर आल्यानेतर बिश्नोई त्याच्यावर नाराज आहे. सलमान खानला मारण्यासाठी दोन वेळा त्याच्या घराची आणि फार्महाऊसची रेकीसुद्धी करण्यात आली होती. तर तिसऱ्या वेळी सलमानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता.
1998 मध्ये एका शुटिंगदरम्यान सलमान खानने जोधपूरमध्ये काळविटची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतात. त्यामुळे संतापलेल्या बिश्नोई गँगने सलमान खानला संपवण्याचा निर्धार केलाय. यासाठी लॉरेन्स बिश्नोईने संपत नेहरा या आरोपीला रेकी करण्यासाठी मुंबईला पाठवलं होतं. पण हरियाणा एटीएसने संपत नेहराला अटक केली.
टार्गेट नंबर - 2: सगुनप्रीत सिंह
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर दुसऱ्या क्रमांकावर पंजाबी गायक सिद्धू मुसावालाचा मॅनेजर सगु्नप्रीत सिंह आहे. सगुनप्रीतने लॉरेन्सा बिश्नोईचा अगदी खास व्यक्ती विक्की मुद्दुखेडाची हत्या करणाऱ्या आरोपीला आश्रय दिला होता. विक्रीची मोहालीत गोळ्या झाडून 2021 मध्ये हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स विक्कीला आपल्या भावाप्रमाणे मानत होता.
टार्गेट नंबर - 3 : गँगस्टर मनदीप धालीवाल
गँगस्टर मनदीप धालीवाल हा लॉरेन्स गँगच्या हिट लिस्टवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. धालीवाल हा बंबीहा गँगचा प्रमुख लक्की पटियालचा एकदम खास मानला जातो. विक्की मुद्दुखेड्याचा मारेकऱ्यांना मनदीप धालीवाल यांनी मदत केली होती त्यामुळे त्याची हत्या करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोईने आखल्याचं एनआयएच्या तपासत समोर आलं आहे.
टार्गेट नंबर - 4 : गँगस्टर कौशल चौधरी
गँगस्टर कौशल चौधरी गुरुग्राच्या तुरुंगात आहे. बिश्नोई गँग आणि कौशल चौधरीच्या गँगमध्ये छत्तीसचा आकडा आहे. लॉरेन्स चौधरीच्या कबुली जबाबात कौशल चौधरीने विक्कीचे मारेकारी भोलू शुटर, अनिल लठ आणि सन्नी ले्फ्टी यांना शस्त्र पुरवली होती.
टार्गेट नंबर - 5. अमित डागर
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर पाचव्या क्रमांकावर असलेला अमित डागर हा बंबीहा गँगचा प्रमुख आहे. बिश्नोई गँग आणि बंबीहा गँगमध्ये अनेकवेळा खूनी खेळ रंगला आहे. बंबोही गँगने लक्की पटियालच्या सांगण्यावरून गोल्डी बराडचा भाऊ गुरलाल बराड याची हत्या करण्यात आली होती. याशिवाय बंबीह गँगने विक्री मुद्दुखेडाच्या मारेकऱ्यांनाही लपण्यात मदत केली होती.