राजस्थान : हरियाणातील (haryana) गँगस्टर संदीप (gangster sandeep sethi) सेठीची 19 सप्टेंबर रोजी भरदिवसा हत्या करण्यात आलीय. राजस्थानच्या (rajasthan) नागौर जिल्ह्यात सुनावणीसाठी कोर्टात येणाऱ्या सेठीवर (sandeep sethi) आरोपींनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी न्यायालयाच्या आवाराबाहेर सेठीवर अनेक राऊंड फायर केले. त्यानंतर बाईकवर बसून हल्लेखोरांनी पळ काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोळीबाराचा (firing) आवाज ऐकून घटनास्थळी एकच खळबळ उडाली. संदीप सेठीवर गोळ्या झाडून (firing) हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळी लागल्याने सेठी  खाली पडताना दिसत आहेत. गुन्हेगारांनी संदीपवर अनेक राऊंड फायर केले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना काही समजण्याआधीच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाताना दिसले. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक धावू लागल्याने रस्त्यावर गोंधळ उडाला.


संदीप हा हरियाणाचा कुख्यात गुंड आणि सुपारी किलर होता. तो सेठी टोळीशी संबंधित होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दारू तस्करीसोबत सुपारी घेऊन हत्या करायचा. त्याने नागौर येथील एका व्यापाऱ्याची हत्याही केली होती. 


नागौर न्यायालयात गोळीबाराची ही घटना घडली तेव्हा तेथे गोंधळ उडाला. या न्यायालयीन संकुलापासून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचे घर अवघ्या 50 मीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्यांचे कार्यालय तेथून 100 मीटर अंतरावर आहे.



पोलिसांनी सांगितले की, गँगस्टर संदीप सेठीची दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती. तो राजस्थानच्या नागौर न्यायालयात दुसऱ्या एका खटल्यात हजर राहण्यासाठी आला होता. या घटनेच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवली जात आहे. प्रथमदर्शनी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.