CNG and PNG Price Reduced: गेल्या दोन-तीन वर्षापासून एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एलपीजीच्या किमतीत वाढ होत असल्याने सामान्य माणसाच्या खिशाचा भारही वाढू लागला आहे. परिणामी अनेकांनी स्वयंपाक घरात एलपीजीच्या ऐवजी गॅसच्या पाईप लाईनला जास्त पसंती दिली आहे. याचपार्श्वभूमीवर स्वयंपाकघरांना पुरवल्या जाणाऱ्या पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि ऑटोमोबाईलसाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किंमतीबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महागाई लक्षात घेता निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढती महागाई लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळाने स्थानिक पातळीवर उत्पादित नैसर्गिक वायूची किंमत ठरवण्याची नवी यंत्रणा जाहीर केली. या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करत घरगुती वापराच्या पाइप नॅचरल गॅस व कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (Piped natural gas and compressed natural gas) किमती कमी होणार आहेत. तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस (Maharashtra Natural Gas) या शहरी गॅस वितरण कंपनीने नाशिक व धुळे परिसरात किरकोळ विक्री किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दराप्रमाणे पाइप गॅसची किंमत प्रती एससीएमला साडेपाच रुपयांनी कमी होईल. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किमती किलोला 6 रुपये कमी झाल्या आहेत.


वाचा : पुढचे पाच दिवस राज्यातील 'या' भागांना गारपीटीचा तडाखा


20 टक्क्यांनी स्वस्त 


MNGL ची दरकपात घरगुती वापराच्या नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत कपात झाल्याने करण्यात आली आहे. दरकपातीनंतर घरगुती वापराच्या नैसर्गिक वायूच्या PNG किंमत LPG सिलिंडरच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंनीतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.  या दरकपातीनंतर एमएनजीएलचे सीएनजी आताच्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या तुलनेत सुमारे 48 टक्के व 25 टक्के बचत होईल. तर दुसरीकडे 48 टक्के बचत ही प्रवासी वाहतुकीच्या वाहनांसाठी तर 25 टक्के बचत ऑटोरिक्षांसाठी असले. 


सीएनजी व पीएनजी किंमत कमी


पुण्यात CNG ची किंमत 92 रुपये प्रति किलो असल्याने आता 87 रुपये प्रति किलोपर्यंत कमी केली जाईल. त्याचप्रमाणे PNG ची किंमत 57 रुपये ऐवजी 52 रुपये असेल. मुंबईत 54 रुपयेचा दर 52 रुपये होणार आहे.  दरम्यान गॅस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार गॅस उत्पादकांना अतिरिक्त उत्पादनावर 20 टक्के प्रीमियम देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे उत्पादकांना गॅसचे उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल.