नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसबा निकालांनंतर मोठ्या प्रमाणावर हिंसा झाल्याचे समोर येत आहे. हिंसेची तीव्रता एव्हढी वाढलीये की, अनेक ठिकाणी जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये या हिंसक घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील तीव्र हिंसेनंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांशी फोनवरून चर्चा केली आहे. या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्कार आणि हत्यांचा आरोप
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत बंगालमधील हिंसेदरम्यान, महिलांवर बलात्कार करण्यात आला. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला गेला. त्यांना घेरून हत्या करण्यात आली. या हिंसक घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत. असे म्हटले आहे.


याआधीदेखील टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या हत्येचा आरोप लावत टीएमसीच्या हिंसेवर टीका केली आहे. भाजपने आपल्या कार्यालांमध्ये झालेल्या तोडफोड आणि आग लावल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 24 परगना जिल्ह्यात ज्या नागरिकांनी भाजपला मतदान केले आहे. त्या कार्यकर्त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे.


उद्या भाजप देशभर प्रदर्शन करणार
बंगालमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर भाजप 5 मे रोजी देशव्यापी प्रदर्शन करणार आहे. भाजप कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हिंसेचं समर्थन करतील.