मुंबई / बंगळुरू : कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्याप्रकरणी शार्पशूटर भरत कुरणेला अटक करण्यात आलीय. महाराष्ट्र एसआयटीने बंगळुरूमधून शार्पशुटर भरत कुरणेला ताब्यात घेतलंय. पानसरे हत्याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आलीय तर दोघे जण फरार आहेत. भरत कुरणे यानेच हल्लेखोरांना प्रशिक्षण दिल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात कुरणेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याशिवाय आणखी एक संशयित वासुदेव सूर्यवंशीलाही एसआयटीने ताब्यात घेतलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरत कुरणे पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी आहे. तर वासुदेव सुर्यवंशी हा नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी आहे. या दोघांनाही दुपारी २ वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


चिखले गावाजवळ भरत कुरणे याचं एक रिसॉर्ट आहे. याच रिसॉर्टवर हत्येचा कट शिजल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. कारण, आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या सगळ्यांचाच चिखले गावाला हजेरी लागलेली आहे.