नवी दिल्ली :  कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करतना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाही. गौरी लंकेश ही आमच्या हृदयात आहे. माझ्या भावना गौरी लंकेश यांच्या परिवारासोबत आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे.'
 



दरम्यान, राहुल यांच्या सोबतच अनेक नेत्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आहे. क्रीडामंत्री (स्वतंत्र जबाबदारी) राज्यमंत्री राठोड यांनी म्हटले आहे की, गौरी लंकेश यांच्या हत्येची बातमी येत आहे. मी पत्रकारांच्या हत्येचा निषेध करतो. 



कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपील सिब्बल यांनीही ट्विटकरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'गौरी एक चळवळी पत्रकार होती. तिला गोळ्या घालून शांत करण्यात आले. जे लोक वेगळे विचार व्यक्त करतात अशा लोकांसाठी गौरीची हत्या हा शांत बसण्यासाठी दिलेला संदेश आहे. हा प्रकार अत्यंत दूर्दैवी आहे,' असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. 



दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही गौरी लंकेशच्या हत्येला दुर्दैवी असे म्हटले आहे.