Gautam Adani, Adani Enterprises : अदानी समुहाचे शेअर्स सपाटून आपटल्याचे पडसाद राज्यसभेतही (Rajya Sabha) उमटण्याची शक्यता आहे. केरळचे सीपीआय खासदार बिनॉय विश्वम यांनी राज्यसभेत यावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी केलीय. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समुहाचे शेअर्स धडाधड कोसळल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येते आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदानी समूहाला अनेक सरकारी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया तसंच एलआयसीसारख्या संस्थांचा समावेश आहेत. हजारो कोटींचा सरकारी पैसा अदानी समुहात गुंतला आहे. तेव्हा जर अदानी समुहाला नुकसान झाल्यास त्याचा फटका देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेत याच्या चर्चेची मागणी करण्यात आली आहे.


अदानी समूहाचा सर्वात मोठा निर्णय, 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द


अदानी समुहाने अखेर आपला 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला आहे. (Adani Enterprises FPO) गुंतवणूकदारांना मात्र त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. कंपनीच्या सदस्यांच्या हितासाठी एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं अदानी समुहानं म्हटले आहे.


अमेरिकन फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाचा मोठा फटका अदानी समुहाला बसला होता.. शेअर बाजारात हेराफेरी आणि फसवणूक केल्याचा आरोप हिंडेनबर्गने अदानींवर केला होता. अदानी समुहाने हे आरोप फेटाळले होते मात्र शेअर बाजारात अदानींचे शेअर्स धडाधड कोसळले होते. त्याचमुळे अदानींनी एफपीओ रद्द केल्याचं बोललं जातंय.. मागच्या 5 सत्रांमध्ये अदानी समूहाने तब्बल 7 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल गमावले आहे.


चार महिन्यांनंतर आयपीओ येऊ शकतो


अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ येत्या दोन-चार महिन्यांत पुन्हा येऊ शकतो. अदानी समूहाचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय सद्यस्थिती लक्षात घेता चांगला आहे, कारण एखाद्या संस्थेला मोठे शेअर्स देण्याचे ओव्हरहॅंग आहे आणि ही परिस्थिती भविष्यासाठी कठीण आहे. कंपनीला सर्व बाजूंनी संकटांनी घेरले आहे. अशा परिस्थितीत बाजार हा विकास सहजासहजी घेणार नाही अशी अपेक्षा आहे आणि शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गुरुवारी अदानीच्या शेअरमध्ये आणखी घसरण दिसून येऊ शकते.