Gautam Adani Hindenburg Saga : हिंडनबर्ग अहवालामुळं अडचणीत आलेल्या उद्योगपती गौतम अदानी (Businessman Gautam Adani ) यांच्या मागे लागलेलं अडचणींचं सत्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच सध्या हिमाचल प्रदेशात सुरु असणाऱ्या सिमेंट वादामध्ये आता अदानींच्या काही कारखाने, कंपन्यांवर धाडसत्र सुरु झालं आहे. बुधवारीच स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटकडून हिमाचलमधील अदानी विल्मर ग्रुपवर धाड टाकण्यात आली. दरम्यान, बुधवारी अदानींचे शेअर्स पडलेले असताना त्यामध्ये काहीशी उसळी पाहायला मिळाली. पण पुन्हा नुकसानाचं तेच चित्र पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानींनाही मागे टाकणाऱ्या गौतम अदानी यांना काही दिवसांतच मोठा फटका बसला. यातूनच सावरत असताना आता हिमाचलमधील प्लांटवर पडलेली धाड त्यांच्या अडचणींमध्ये भर टाकणारी ठरत आहे. 


Hindenburg report मुळे वाढल्या अदानींच्या अडचणी 


काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या हिंडनबर्ग अहवालामुळं गौतम अदानी यांचा आर्थिक डोलारा कोलमडण्यास सुरुवात झाली. आर्थिक अफरातफरीचा आरोप त्यांच्यावर या अहवालातून करण्यात आला. ज्यानंतर सातत्यानं त्यांच्या शेअर्सची घसरण पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर अदानींकडून 20 हजार एफपीओ तडकाफडकी रद्द करण्याचाही निर्णय घेतला होता. 


VIRAL VIDEO : 'कुणीतरी खाजखुजली टाकली राव'; भर कार्यक्रमात मंत्री बेजार, शेवटी कपडे काढून...


बुधवारी त्यांच्या परिस्थितीत हलकीशी सुधारणा दिसून आली. जिथं अदानी एंटरप्रायजेसचे शेअर 2,158.65 रुपये इतक्या दरावर बंद झाले. ही साधारण 19.76 टक्क्यांची वाढ होती. ज्यामुळं अदानींचं मार्केट कॅपिटलायझेशन  40,601.14 रुपयांनी वाढून 2.46 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. 


अदानी वादाचा फटका केंद्रातील सत्ताधाऱ्यांना फटका 


अदानी वाद पेटलेला असतानातच आता याच्या झळा संसदेपर्यंत पोहोचल्या आहेत. जिथं विरोधकांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जिथं, काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर अदानींना संकटापासून वाचवत असल्याचा गंभीर आरोप लावला. त्यामुळं आता येत्या काही दिवसांमध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदानींचा मुद्दा आणखी धुमसणार हे नक्की.