नवी दिल्ली : क्रिकेटपटू गौतम गंभीर क्रिकेटनंतर ट्विटरमुळे सध्या चर्चेत असतो. गंभीर आता सडेतोड बोलण्यासाठी ओळखला जातो. यातच गौतम गंभीर आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात 12 ऑक्टोबरला चांगलंच ट्विटर युद्ध पाहायला मिळालं. जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे झालेल्आ चकमकीत मनन वानी मारला गेला होता. त्यावर गौतम गंभीरने ट्विट केलं होतं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरने ट्विट केलं की, 'आपण एका दहशतवाद्याला मारले आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस आणि भाजपने आपल्या माना खाली घातल्या पाहिजेत. तुमच्यामुळे एका शिक्षित व्यक्तीला पुस्तकातून बाहेर येऊन बंदुक हाती घ्यावी लागली.'



गंभीरच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले की, 'जो माणूस मननचं गाव सोडा पण त्याचा जिल्हा देखील नकाशात शोधू शकत नाही. तो विचारतोय की कश्मीरमधील युवकांना हातात बंदूका घ्यायला कोण प्रेरीत करत आहे. गंभीर महोदय यांना काश्मीर विषयी तितकंच माहित आहे जितकं मला क्रिकेट विषय काहीच माहिती नाही.'



ओमर अब्दुलांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना गंभीरने ट्विट केलं की, 'ओमर अब्दुल्ला तुम्ही नकाशाच्या गप्पा मारू नका. तुम्ही काश्मीरचा नकाशा पाकिस्तानच्या नकाशा सोबत मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही बाहेर पडा आणि सांगा की, तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी कश्मीरी युवकांना आपल्या गटात सहभागी करुन घेण्यासाठी काय केलं.'



यावर प्रत्यूत्तर देतांना ओमर अब्दुला म्हणतात की, 'माझ्या दोन सहकाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्याला अजुन एक आठवडाही झाला नाही. 1988 पासून माझ्या हजारो कार्यकर्त्यांची हत्या दहशवताद्यांनी केली आहे. त्यामुळे मला राष्ट्रवाद आणि बलिदान यावर कोणीही शिकवण्याची आवश्यकता नाही.'



मग गंभीर म्हणतो की, 'या गोष्टीत तुम्ही एकटेच नाही ओमर अब्दुल्ला, तुमच्यासारखे अनेक राजकारणी स्वत:ला आरसा दाखवणे पसंद करत नाहीत. हेच कारण आहे की माझ्या देशाचे रक्त वाहत आहे. राष्ट्रवाद आणि बलिदानासाठी वास्तविक चरित्र असणाऱ्या पुरुषांची गरज आहे. तुमच्या सारख्य़ा सोशल मीडियावर 280 शब्दात तोंड चालवणाऱ्यांची नाही.'