गज चक्रीवादळाचा धुमाकुळ, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
वादळाचा जोर पुढचे काही तास असाच कायम राहील असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
तामिळनाडू : तामिळनाडू किनाऱ्यावरील नागापट्टीणम जिल्ह्यात गज चक्रीवादळानं पहाटेपासून धुमाकुळ घातलाय. जिल्ह्यात ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगानं वारे वाहत असून मुसळधार पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलंय. पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी गज वादळ नागापट्टीणम जिल्ह्यात धडकलं. सकाळी सहा वाजेपर्यंत वादळाचा बहुतांश भाग हिस्सा समुद्रातून भूगावर पोहचला असून वादळाचा जोर पुढचे काही तास असाच कायम राहील असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
नागरिक सुरक्षित स्थळी
गज वादळामुळे नागापट्टणीम जिल्हात ७६ हजार २९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
जवळपास तीनशे कर्मचारी मदत कार्यासाठी तैनात आहेत. नागापट्टीणमसह सहा जिल्ह्यात वादळाचा फटका बसलाय.
एकूण एनड़ीआरएफच्या चार तुकड्या मदतकार्य़ासाठी तैनात असून आपातकालीन स्थितीसाठी आणखी काही तुकड्यांना तयार ठेवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं स्पष्ट केलं.