नवी दिल्ली : दीर्घ कालावधीनंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा बहरत असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीमध्ये GDP चा विकास दर 20.1 टक्के राहिला आहे. हा आकडा कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुधारल्याचे संकेत आहेत. GDP कोणत्याही देशाच्या आर्थिक  परिस्थितीचे मोजमाप करण्याचे योग्य परिमाण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

GDP वर गुड न्यूज
केंद्र सरकारने, चालू वित्त वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीनंतर GDP चे निकाल जारी केले आहेत. पहिल्या तिमाहीमध्ये GDP चा  विकास दर 20.1 टक्के असून तो मागील वर्षाच्या तिमाहीमध्ये निगेटिव्ह 23.9 टक्के होता. म्हणजेच यावर्षीचे आकडे अर्थव्यवस्था सुधाराकडे वाटचाल करीत आहेत.


कोरोना संसर्गामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम
कोरोना संसर्गामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले होते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये GDP 23.9 टक्क्यांची मोठी घसरण पहायला मिळाली होती.
दुसऱ्या तिमाहीत 7.5 टक्के विकासदरात घसरण
तिसऱ्या तिमाहीत 0.4 टक्के विकासदर
चौथ्या तिमाहीत 1.6 टक्के विकासदर 
त्यानंतर आता 2021-22 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 20.1 टक्के विकासदर म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे.