मुंबई : सामान्य ज्ञान ही अशी गोष्ट आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते. जे लोक याबद्दलचा अभ्यास करतात किंवा त्याच्याशी संबंधीत एखादी परीक्षा देतात. तेव्हा त्यांना सामान्य ज्ञानासंबंधीत प्रश्न विचारले जातात. तर असेच काही प्रश्न आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत, त्यामुळे जर तुम्ही एखाद्या सरकारी परीक्षेला बसणार असाल, तर तुम्हाला हे प्रश्न मदत करतील. शिवाय तुम्हाला सामान्य ज्ञाना विषयी माहिती असेल, तरी देखील तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये पॉप्युलर होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या जनरल नॉलेज प्रश्न आणि त्याची उत्तरं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रश्न 1 : भारतात असं कोणतं शहर आहे ज्याच्या नावात हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत शब्द आहे?
उत्तर : याचं उत्तर आहे 'अहमदाबाद' यामधील 'अहम' हा संस्कृत शब्द आहे, तर 'दा' हा इंग्रजी शब्द आहे आणि 'बाद' हा एक हिंदी शब्द आहे. जो मिळून एका शहराचं नाव तयार होतं


प्रश्न 2 : असं कोणतं झाडं आहे, ज्याला लाकडं नसतात?
उत्तर : द्राक्ष आणि केळी ही दोन अशी झाडं आहेत, ज्याला लाकूड नसतं.


प्रश्न 3 : अशी कोणती गोष्ट आहे, जी वरती जाते आणि खालती देखील जाते. पण तरीही ती एकाच जागी असते?
उत्तर : याचं उत्तर आहे पायऱ्या. पायऱ्या या आपल्याला वर आणि खाली घेऊन जातात. शिवाय त्या आपल्या जागेवरुन हलत देखील नाहीत.


प्रश्न 4 : असा कोणता राजा आहे, ज्याच्याकडे ना पैसा आहे ना राजमहल?
उत्तर : सिंह हा जंगलाचा राजा आहे. पण तरीही त्याच्याकडे ना राजमहल आहे, ना पैसा.


प्रश्न 5 : असा कोणता देश आहे, ज्याचं पहिलं अक्षर काढून टाकलं तर ती, खाण्याची गोष्ट बनते
उत्तर : जपान हा असा देश आहे, ज्यामधील ज काढून टाकला, तर त्याचं पान होतं. जी खाण्याची वस्तु आहे.