GK Quiz: भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?
GK Quiz in Marathi : आपल्या शैक्षणिक वर्षात किंवा नोकरीसाठी मुलाखत देताना सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. यासाठी आपलं वाचन जितकं चांगले तितकं या प्रश्नांची उत्तर देणं सोप असतं.
GK Quiz in Marathi : आजच्या स्पर्धात्म युगात सामान्य ज्ञान प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. सामान्य ज्ञान म्हणजे विविध विषयांची आणि तथ्यांबद्दल असलेली जागरुकता. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी यांचा समावेश होतो. पुस्तकं आणि वर्तमानपत्रातून आपल्या जगातील अनेक घडामोडींची माहिती मिळते. याशिवाय अशा काही गोष्टी असतात ज्यावर विश्वसा ठेवणं कठिण असतं. पण अशा गोष्टी प्रत्यक्षात असतात. त्यामुळे त्या गोष्टींची निर्मिती कशी झाली, त्यांचा इतिहास काय आहे हे जाणू घेणं म्हणजे सामान्य ज्ञान.
आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही सामान्य ज्ञानावर (Genral Knowledge) आधारित प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत.
प्रश्न - कोणत्या नदीचं पाणी नेहमी गरम असतं?
उत्तर - ही नदी दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशात आहे. या नदीचं पाणी 24 तास गरम असतं. ही नदी जवळपास 7 किमी लांब आहे. एका टोकावर ही नदी जवळपास 80 फूट रुंद होते, तर एका टोकावर ही नदी 16 फूट खोल आहे.
प्रश्न - सात नद्यांचा देश कोणता आहे?
उत्तर - सात नद्यांचा देश म्हणून बांगलादेश ओळखला जातो.
प्रश्न - भारतातल्या सर्वात लहान नदीचं नाव काय आहे?
उत्तर - भारतातल्या सर्वात लहान नदीचं नाव अरवरी नदी आहे. ही नदी राजस्थानमध्ये असून या नदीची लांबी 45 किलोमीटर इतकी आहे.
प्रश्न - भारतातली कोणती नदी गोड्या पाण्याची म्हणून ओळखली जाते?
उत्तर - गोड्या पाण्याची नदी भारतातल्या दक्षिण भागातून वाहते. ही नदी कर्नाटक राज्यात असून या नदीचं नाव तुंगभद्रा असं आहे.
प्रश्न - देशातील सर्वा स्वच्छ नदी कोणती आहे?
उत्तर - मेघालयातील उमनगोत नदीला देशातील सर्वात स्वच्छ नदीचा दर्जा दिला आहे. या नदीचं पाणी इतकं स्वच्छ आहे की होड्या काचेवरुन जात असल्याचा भास होतो.
प्रश्न - भारतातील सर्वात खोल नदी कोणती आहे?
उत्तर - भारतातली सर्वात खोल नदी म्हणून सिंधु नदी ओळखली जाते. ही नदी लेह पासून इस्लामाबादपर्यंत आणि कराची शहरापर्यंत वाहते. ही नदी जवळपास 200 मीटर खोल आहे.
प्रश्न - भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?
उत्तर - देशातल्या ब्रम्हपूत्र नदीला (Bramhaputra River) पुरुष नदी म्हणून ओळखलं जातं.