GK Questions And Answer: स्पर्धात्मक युगात टिकायचं असेल तर व्यवहार ज्ञानाबरोबच सामान्य ज्ञान (General Knowledge) असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता कोणतीही माहिती मिळवायची असेल तर आपण अगदी सहजपणे मोबाईलमध्ये गुगलवर जाऊन सर्च करतो. जगातील सर्व माहिती एका क्लिकवर मिळत असल्याने वाचण आणि स्मरण हे मागे पडत चाललं आहे. पण एखाद्या कंपनीत मुलाखत किंवा स्पर्धा परिक्षांमध्ये मोबाईलचं ज्ञान उपयोगी पडत नाही. अशा वेळी तुमचं वाचनचं महत्त्वाचं ठरतं. आपलं सामान्य वाढण्यासाठी आम्ही काही प्रश्न घेऊन आलोय. हे प्रश्न जितके मजेदार आहेत, तितकेच ते माहितपूर्णही आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रश्न : सिंधु घाटी सभ्यता कोणत्या गोष्टीसाटी ओळखली जाते
विज्ञान
धातू शास्त्र
जल व्यवस्थापन प्रणाली
उत्तर- जल व्यवस्थापन प्रणाली


प्रश्न : वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न बनवतात?
श्वसन
प्रकाशसंश्लेषण
डी-कंपोजिशन
फर्मेंटेशन
उत्तर- वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे त्यांचं अन्न तयार करतात, ज्याला इंग्रजीत Photo-Synthesis म्हणतात. या प्रक्रियेदरम्यान, वनस्पतींना हिरव्या पानांमध्ये असलेल्या क्लोरोप्लास्टच्या मदतीने सौर ऊर्जा मिळते आणि तिचं रासायनिक उर्जेमध्ये रूपांतर होतं.


प्रश्न- भारताच्या पश्चिमेकडून कोणत्या पर्वतरांगा आहेत?
हिमालय
आरवली
पश्चिम घाट
पूर्व घाट
उत्तर- पश्चिम घाट (Western Ghats)


प्रश्न : गिनीज रेकॉर्डनुसार, जगातील सर्वात मोठं लिविंग स्ट्रक्चर कोणतं आहे, जिथे माशांच्या 1,500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत?
ग्रेट बॅरियर रीफ
amazon रेनफॉरेस्ट
ग्रँड कॅन्यन
चीनची महान भिंत
उत्तर- ग्रेट बॅरियर रीफ (Great Barrier Reef)


प्रश्न : अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो?
साहित्य
मिडिया
सायन्स
क्रीडा
उत्तर- क्रीडा


प्रश्न : अक्षरांच्या एका ओळीचा वापर करून कीबोर्डवर लिहिता येणारा सर्वात लांब शब्द कोणता आहे?
रेफ्रिजरेटर
टाइपराइटर
स्टेबलाइजर
प्रिंसेस
उत्तर- टाइप राइटर (Typewriter)


प्रश्न : जगातील एकमेव पक्ष्याचे नाव सांगा जो मागे उडू शकतो?
हमिंगबर्ड
पोपट
शहामृग
उत्तर- हमिंगबर्ड (Hummingbird),हा एकमेव पक्षी आहेत जे मागे उडू शकतात. हे पक्षी जगातील सर्वात लहान स्थलांतरित पक्षी आहेत.