Trending GK Quiz: देशात कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातात. यासाठी आधीपासून वाचन आणि चालू घडामोडींची माहिती असणं आवश्यक असतं. याच उद्देशाने सामान्य ज्ञानावर आधारीत काही प्रश्न आम्ही घेऊन आलो आहोत. या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर आलं नाही तर प्रश्नाच्या खाली उत्तर सांगण्यात आलं आहे. या प्रश्नांची उजळणी करत तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेचा सराव करु शकता. रेल्वे, बँकिंग किंवा इतर परीक्षेत अशा स्वरुपाचे प्रश्न हमखास विचारले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर मग तयार व्हा या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी
 
प्रश्न -  नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला पहिला भारतीय कोण?
उत्तर - नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) आहेत. 


प्रश्न - भारतात कोणत्या ठिकाणी केसरचं सर्वाधिक उत्पन्न घेतलं जातं?
उत्तर - भारताचा केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मिरमध्ये केसरचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं.


प्रश्न - कथकली हे कोणत्या राज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे?
उत्तर - कथकली हे केरळ राज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे.


प्रश्न - महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का?
उत्तर - महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपळ कृष्ण गोखले (Gopal Krishna Gokhle) होते.


प्रश्न - तुम्हाला माहित आहे का ARMY आणि NAVY चा फुल फॉर्म काय? 
उत्तर - ARMY चा फूल फॉर्म 'Alert Regular Mobility Young' असं आहे. तर NAVY चा फूल फॉर्म 'Nautical Army of Volunteer Yeomen' असं आहे.