GK Quiz In Marathi : स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत.  तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा. कारण सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नांची किती उत्तरं तुम्ही अचूक देता यावर तुमची निवड ठरलेली असते. यासाठी प्रश्नमंजुषा सोडवण्याचा सराव आणि वर्तमान पत्रांचं वाचन करणं महत्त्वाचं ठरतं. कला, क्रीडा, चालू घडामोडी, जगभरातील आश्चर्य यांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रश्न - भारताचं मॅनचेस्टर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं?
उत्तर - गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराला भारताचं मॅनचेस्टर म्हणून ओळखलं जातं. 


प्रश्न - लिहितो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही, सांगा मी कोण?
उत्तर - या प्रश्नाचं उत्तर आहे टाईपरायटर. टाईपरायटरवर टाईप करुन आपण पाहिजे ते लिहू शकतो, टाईप करताना मशीनचा टिक-टिक असा आवाज येतो.


प्रश्न - एक महिला 1980 मध्ये जन्मली आणि 1980 मध्येच तिचा मृत्यू झाला. मृत्यूवेळी तिचं वय 40 होतं कसं?
उत्तर - या महिलेचा जन्म 1980 मध्ये झाला होता.  मृत्यूवेळी तिला ज्या रुग्णालयात ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्या वॉर्डचा नंबर होता 1980. वयाच्या चाळीसव्या वर्षी तिचा मृत्यू झाला.


प्रश्न - अफीमचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होतं?
उत्तर - अफीमचं सर्वात जास्त उत्पादन अफगाणिस्तान देशात होतं.


प्रश्न - जगातील सर्वात जूनं शहर कोणतं आहे?
उत्तर - जगातील सर्वात जूनं शहर सीरियामधील दमिश्क हे आहे. दमिश्क जगातील प्राचीन शहराला असल्याची मान्यता देण्यात आली आहे. या शहराचा इतिहास जवळपास 11000 वर्श जूना आहे. या शहराने अनेक 
महान संस्कृतींचा उदय आणि अस्त पाहिला आहे.


प्रश्न - असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
उत्तर - हा जीव आहे साप. सापाला पाय नसतात, तो सरपटणारा प्राणी आहे. तसंच सापाला कानही नसतात.