नवी दिल्ली : जर तुमच्याकडे कार आहे पण तुम्ही दुसरी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी योजना बनवत आहे. जुनी गाडी रिप्लेस करुन नवी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल किंवा डिझेल कार स्क्रॅप करुन नवी इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी सरकार 2.5 लाखांची मदत देणार आहे. तर 1.5 लाख रुपयांची दुचाकी गाडी खरेदी करणाऱ्यांना सरकार 30 हजार रुपये सबसिडी देणार आहे. सरकारने याबाबत एक ड्राफ्ट नीती तयार केली आहे.


कॅब अग्रीगेटर आणि बस संचालकांना हरित वाहनासाठी अधिक मदत मिळणार आहे. टॅक्सीच्या रूपात चालवण्यासाठी 15 लाख रुपयांच्या गाडीवर 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये मदत मिळणार आहे.


या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी 5 वर्षामध्ये सरकार मदत म्हणून 1500 कोटी रुपये खरेदी करण्याचा विचार करत आहे. जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करुन देशभरात चार्जिंग स्टेशन बनवण्याची योजना आहे.