घरबसल्या 10 मिनिटांत पॅनकार्ड मिळवा; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वाचा
घरबसल्या पॅनकार्ड कसे बनवायचे? तसेच त्यासाठी कोणते कागदपत्र लागतील, वाचा..
PAN CARD : सध्या बॅंकिंग आणि फायनान्सशी निगडीत बहुतांश कामांसाठी पॅनकार्ड अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे लोकांना पॅनकार्ड बनवतांना अडचणी येऊ नये. तसेच जास्तीत जास्त लोकांनी पॅनकार्ड बनवावं यासाठी सरकार सुद्धा पाऊले उचलत आहे. आता तु्म्ही घरबसल्या 10 मिनिटात पॅनकार्ड बनवू शकता. ऑनलाईन पॅनकार्ड बनवल्यानंतर 10 अंकी क्रमांक तयार होतो. हा क्रमांक आयकर विभागाकडून देण्यात येतो. त्यामुळे घरबसल्या पॅनकार्ड कसे बनवायाचे तसेच त्यासाठी कोणते कागदपत्र लागतील ते पाहूया.
1. आयकर विभागाकडून पॅनकार्ड मिळवण्यासाठी ई-फाइलिंग पोर्टवर या पोर्टवर जाऊन 'Instant PAN through Aadhaar' वर क्लिक करा. त्यानंतर 'Get New PAN' या पर्यायाची निवड करा. तुम्हाला तुमचा आधार क्रमांक सबमिट करावा लागेल. त्यानंतर नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर OTP पाठवला जाईल. OTP च्या प्रमाणिकरणानंतर e-PAN जारी करण्यात येईल.
2. या प्रक्रियेत अर्जदाराला पीडीएफ स्वरूपात पॅनकार्डची कॉपी मिळेल. ज्यावर QR को़ड असतो. या कोडमध्ये अर्जदाराची माहिती आणि फोटो असतो. अर्जदाराच्या नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर 15 अंकी क्रमांक पाठवला जातो. तुमचे आधार ईमेलला लिंक असेल तर, पॅनकार्ड ईमेलवरही पाठवले जाते.
3. आयकर विभागाने म्हटलं आहे की, या प्रक्रियेला साधारण 10 मिनिटे लागू शकतात. आतापर्यंत 6.7 लाख लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.