मुंबई : सर्वात पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. पॉवरफुल पासपोर्टमुळे सिंगापूरमधील नागरिकांना सर्वाधिक देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करता येतो. या यादीत भारत ७५व्या स्थानी आहे. देशात दरवर्षी हजारो नागरिक आपला पासपोर्ट काढतात. तुम्ही अजूनही पासपोर्ट काढला नाहीये तर आता काही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने तुम्ही सात दिवसांत पासपोर्ट काढू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्र मंत्रालयाने सोपे केले नियम
२०१६मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्यासाठीचे नियम सोपे केलेत. ऑनलाईन अर्जासह तुम्ही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने एका आठवड्यात पासपोर्ट बनवू शकता. 


ही कागदपत्रे आवश्यक


ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आपल्यावर कोणताही क्रिमिनिल गुन्हा नाही हे सिद्ध करणारे अऍफेडव्हिट सादर करणे गरेजेचे असते. अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला पुढील तीन दिवसांत अपॉईंटनमेंट मिळेल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळेल. 


नंतर होईल पोलीस व्हेरिफिकेशन


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मते परराष्ट्र मंत्रालयाने अशी व्यवस्था केलीये ज्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळेल. पासपोर्टसाठी सर्वाधिक वेळ हा पोलीस व्हेरिफिकेशनसाठी जातो. मात्र सात दिवसांत तुम्हाला पासपोर्ट मिळेल त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होईल. 


ऑनलाईन कसा बनवाल पासपोर्ट


स्टेप १ : पासपोर्ट सेवा पोर्टलवर स्वत: रजिस्टर करा 
सर्वात आधी 
http://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink या लिंकवर जाऊन पेजवर register now क्लिक करा. यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर लॉगिन आयडी मिळेल. 


स्पेट २ : लॉग इन करा


तुमच्या ई-मेल आयडीवर लिंक क्लिक करुन अकाऊंट अॅक्टिव्हेट करा. त्यात युझर आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टवर क्लिक करा. यात दोन ऑप्शन आहेत. ऑनलाईन पासपोर्ट अर्जासाठी दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करा. 


स्टेप ३ : ऑप्शन निवडा


पहिल्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करताना अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्टवर क्लिक करा. अप्लाय केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्यातील माहिती भरा. लक्षात ठेवा, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. कारण एकदा पासपोर्ट प्रक्रिया रिजेक्ट झाली तर दुसऱ्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करताना वेळ लागतो. 


स्टेप ४ - प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट अॅप्लिकेशन रिसीटवर क्लिक करा आणि अॅप्लिकेशन प्रिंट घ्या. यात तुम्हाला अॅप्लिकेशन रेफरंस नंबर आणि अपॉईंटमेंट नंबर असतो. 


स्टेप ५ - अपॉईंटमेंट बुक झाल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रात जाताना खरी कागदपत्रे घेऊन जाणे गरजेचे असते. केंद्रात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घरी सात दिवसांत पासपोर्ट येईल.