Geyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष
Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.
Geyser Mistakes: बरेचवेळा बाथरुममधील गिझरकडे दुर्लक्ष केले तर ते तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. (Maharashtra News in Marathi) आपण सकाळी आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याला प्राधान्य देत असतो. त्यासाठी गिझर हे असे उत्पादन आहे, जे हिवाळा असो किंवा उन्हाळा प्रत्येक ऋतूत उपयुक्त ठरते. कारण त्याच्या मदतीने तुम्ही पाणी गरम करू शकता आणि ते आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी वापरले जाऊ शकते. गिझर काही मिनिटांत पाणी गरम करतो. तुमच्या घरातही गीझरचा वापर होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवून गिझरचा वापर करु शकता. कारण आजकाल गिझरमध्ये स्फोट होण्याची घटना वेगाने वाढत आहेत.
यूजर्स कोणत्या सामान्य चुका करतात?
सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? की एक चूक महागात पडू शकते. लोक काही चुका करतात आणि त्या चुकांमुळे गिझरमध्ये स्फोट होतो. (Geyser Blast)
पाण्याशिवाय वापर : जर तुमच्या घरातील गिझर थेट पाण्याच्या टाकीशी जोडलेले असेल आणि पाण्याची टाकी रिकामी झाली तर गिझर जास्त तापू शकतो. कारण जेव्हा त्यात पाणी नसते आणि गिझर चालू असेल तेव्हा तो पूर्णपणे गरम होतो आणि यामुळे अनेक वेळा दाब वाढतो आणि त्याचा स्फोटही होतो. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की गिझरमध्ये पाणी भरल्याशिवाय कधीही वीजेचे बटन चालू करु नका आणि टाकीतील पाणी संपले तर ते लगेच भरा म्हणजे गिझरला पाणी मिळेल.
खराब वायरिंग : गिझरची वायरिंग खराब झाली असेल तर ती बदलणे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. कारण अनेक वेळा गिझर वायरिंगमुळे जास्त गरम होतो आणि अशा परिस्थितीत त्याचा स्फोट होऊ शकतो. गिझरमधील दाब जास्त प्रमाणात वाढतो आणि अशा परिस्थितीत त्याचा स्फोट होऊ तो फुटू शकतो आणि यात मोठा अपघाचा धोका असता. त्यामुळे पाणी गरम करताना टाकीत पाणी आह की नाही हे चेक करा. तसेच खराब वायरिंग वेळीच बदलून घ्या. जेणे करुन नंतरचा धोका टळू शकतो.