मुंबई : आज घटस्थापना... नवरात्राला सुरुवात झालीय... नवरात्रानिमित्त महाराष्ट्रातली साडे तीन शक्तीपीठं सजली आहेत. नवरात्रात लाखो भाविक साडे तीन शक्तीपीठांचं दर्शन घेतात. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तश्रृंगी आणि माहुरची रेणुकामाता ही साडे तीन शक्तीपीठं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मंदिरांमध्ये नवरात्रात बरीच गर्दी होते. आजपासून घरोघरी घटही बसलेत किंवा देवीचीही स्थापना करण्यात आलीय... तसंच आजपासून गरब्याची लगबगही सुरू होणार आहे. 


सगळीकडे नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रात 'झी २४ तास'ही नवदुर्गांचा सन्मान करणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आव्हानं स्वीकारुन यशस्वी होणाऱ्या महिलांची यशोगाथा, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध देवींची मंदिरं, देवींचा महिमाही 'झी २४ तास' खास तुमच्यासाठी दाखवणार आहे. 


झी मराठीच्या नवनायिकांबरोबर नऊ देवींचं दर्शनही तुम्हाला 'झी २४ तास' घडवणार आहे.