लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याचा चिमुरड्याला चावा, मालकीण बघ्याच्या भूमिकेत... Video पाहून लोकांचा संताप
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया
Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) सध्या चांगलाच व्हायरल झाला असून या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीजवळच असलेल्या गाझिजाबादमधल्या (Ghaziabad) या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. हा व्हिडिओ नंदग्राम क्षेत्रातल्या राजननर एक्सटेंशन चार्म्स काउंटी सोसायटीतला (Charms Castle, Rajnagar Extension) आहे. सोसायटीतल्या लिफ्टमधला (Lift) हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक महिला आपल्या पाळीव कुत्र्याला (pet dog) घेऊन सोसायटीतल्या लिफ्टमध्ये शिरते. लिफ्टमध्ये एक चिमुरडा शाळेची बॅग पाठिला लावून मागे उभा असल्याचं या व्हिडिओत दिसंतय. तो मुलगा लिफ्टच्या दिशेने जात असतानाच कुत्र्याने हल्ला करत त्याचा चावा घेतला.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तो मुलगा अक्षरश: व्हिवळत असल्याचं व्हिडिओत दिसतोय. पण यानंतरही त्या कुत्र्याच्या मालकिनीला (Pet Owner) जराही दया आली नाही. तीने आहे त्या जागी उभी राहून केवळ बघ्याची भूमिका घेतली. हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर त्या महिलेविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. हा व्हिडिओ 5 सप्टेंबरचा म्हणजे सोमवारचा असून संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यानची ही घटना आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. त्या मुलाला कुत्रा चावल्याचं दिसत असूनही त्या महिलेच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. त्या मुलाची विचारपूस करावी, किंवा त्याला तात्काळ डॉक्टर घेऊन जावं असं तिला जराही वाटलं नाही. तीन केवळ बघ्याची भूमिका घेतली. महिलेच्या या कृतीवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
लिफ्टमधल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. सोसायटीतल्या इतर सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या कुत्र्यामुळे सोसायटीतले सर्व नागरिक त्रस्त आहेत. कुत्र्याच्या मालकिनीला याबाबत अनेकवेळा सांगण्यात आलं. पण त्या महिलेने याची कोणतीही दखल घेतली नाही. आता लिफ्टमध्ये मुलाला कुत्रा चावल्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.