नवी दिल्ली : काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडून भाजपची साथ धरली. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर भाजपवर थेट हल्लाबोल केला. लोकशाहीवरच हल्ला असल्याची टीका काँग्रेसने केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली. भाजपने विरोधी पक्षांचे विद्यामान आमदारांना गळाला लावले. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसची मोठी अडचण झालेय. 



गुजरातमध्ये भाजपने लोकशाहीवरच हल्ला केलाय. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. असे असताना राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कुठून मिळाला, असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी विचारला.


राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच गुजरात काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून यामुळे राज्यसभेची निवडणूक लढवणारे अहमद पटेल यांची कोंडी झालेय.