Lizard Viral Video : महिला असो किंवा पुरुष पाल हे नाव घेतलं तरी त्यांना घाम फुटतो. किळसवाणा आणि भीतीदायक हा इवलूसा प्राणी अनेकांना सळो की पळो करुन सोडतो. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. यात सर्वाधिक सापाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. असाच एका महाकाय प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरा कल्पना करा तुम्ही बाथरुममध्ये आंघोल करत असताना पाल आली तर...? या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी बाथरूममध्ये एन्ट्री मारली तर तिच्या डोळ्यासमोर एक भयानक प्राणी पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. बाथरुमच्या खिडकीतून एक महाकाय सरडा बाथरुममध्ये शिरला अन् तिचे हृदयाचे ठोकेच चुकले. (Girl bathing big lizard entered in bathroom video viral on Social Media Trending News today )


तो सरडा जसा जसा आत येतं होता, ती तरी घाबरुन जोरात ओरडायला लागली. आई आई म्हणून ती आईला आवाज देत आहे. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता ती तरुणी अखेर भीतीने दरवाजा लावून घेते. 


तो सरडा हळू हळू खाली सरकायला लागतो तेवढ्यात त्याचा तोल जातो आणि तो खाली पडणारच तर ती तरुणी अजून जोऱ्यात ओरडायला लागते. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील rumahkumuh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा - Viral Snake Video : भयावह! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ


या व्हिडीओवर यूजर्सच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.



एका युजर्सने म्हटलं आहे की, ''जर मी हे पाहिलं असतं तर मी ते घरच सोडून दिलं असतं.'' तर दुसरा यूजरने लिहिलं आहे की, ''मी मेलेच असते. '' दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे हे समजलेलं नाही. सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. यात मनोरंजनापासून धक्कादायक आणि भीतीदायक व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. जर एखादा व्हिडीओ यूजर्सला आवडला तर त्याला लाखोच्या घरात व्ह्यूज मिळतात. अगदी तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगदेखील होतो. सध्या सरड्याचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पण इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे.