‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…
Crime News In Marathi: तरुणीने तिच्या प्रियकराला भेटायला बोलवले. तो आलादेखील तिची वाट पाहत असतानाच...
Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या 3 अल्पवयीन मुलांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजेच, त्याच्याच प्रेयसीने फोन करुन लखनौ येथून तिच्या या प्रियकराला बोलवून घेतलं होतं. गार्डनमध्ये मी माझी वाट बघ, मी येतेय, असं म्हणत तिने त्याला गार्डनमध्ये बोलवून घेतलं अन् तिथेच घात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा प्रियकर गार्डनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. पण ती तर आलीच नाही पण तिचा नवीन बॉयफ्रेंड त्याच्या 3 मित्रांसोबत तिथे पोहोचला. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला झाडी-झुडपात फेकून दिले आणि घटनास्थळावरुन पोबारा केला.
घटना घडली तेव्हा काही नागरिकांनी घडलेला सर्व प्रकार पाहिला आणि लगेचच पोलिसांना याबाबत सूचना दिली. काही युवक एका तरुणावर चाकूने वार करत आहेत, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत त्या तरुणाचा मृत्यूदेखील झाला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर फरार झालेल्या तरुणीचा शोध सुरू आहे. तरुणीला ताब्यात घेतल्यानंतरच सर्व प्रकरणाचा खुलास होऊ शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर झाली होती ओळख
आरोपींची चौकशी करण्यात आल्यानंतर समोर आले की, अंश यादव एका तरुणीवर प्रेम करत होता. तिने अंशला सांगितले होती की सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी एका तरुणाशी ओळख झाली होती. तो भेटण्यासाठी इंदौरला आला होता. त्याच्यासोबत तरुणीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहे. ते व्हायरल करण्याची धमकी तो सतत देत होता. त्यामुळं तरुणी चिंतेत होती. तरुणीने सर्व घटना सांगितल्यानंतर अंश यादव, ती तरुणी आणि 3 अल्पवयीन मुलांनी त्याच्या हत्येचा कट रचला.
घटनास्थळावरुन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतलं आहे. यात काही संशयित दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे नाव तौफिक असं असून तो लखनौ येथील राहणारा आहे. त्याची इंदौर येथे राहणाऱ्या तरुणीशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. या तरुणीने तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडला तौफिक ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतरच अंश यादवने त्याचा लहान भाऊ आणि त्याच्या अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन हत्येचा कट रचला होता.