बंगळुरू : आजूबाजूला घडणाऱ्या दु:खद घटनांतून न सावरल्याने होणाऱ्या आत्महत्येंच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. घरातील पाळीव प्राण्यावर आपला जीव जडतो , त्यांच्या जाण्याने आतोनात दु: ख होत हेही खर आहे. पण या दु : खातून न सावरता आल्याने दोघींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये घरात पाळलेल्या कुत्र्याचा मृत्यू दोन मुलींच्या जीवावर बेतला आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगळुरूमध्ये घरात पाळलेला कुत्रा मेला म्हणून त्याच्या मालकीणीने आत्महत्या केली. ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला सहन न झाल्याने तिनेही आत्महत्येचं पाऊल उचलल्याचे वृत्त आले आहे. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या सी गॅमिनी या १९ वर्षीय तरूणीकडे जिमी नावाचा कुत्रा होता. 


आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असणारी गॅमिनी बंगळुरूमधील आरपीए महाविद्यालयात बी.कॉमचं शिक्षण घेत होती.  'जिमी हा कुत्रा त्यांच्याकडे चार वर्षापासून राहत होता. या चार वर्षात सी गॅमिनी आणि जिमीमध्ये एक चांगले नाते तयार झाले होते. आजारपणामुळे जुलै महिन्यात जिमिचा मृत्यू झाला.


त्यानंतर गॅमिनीच्या वागण्यातही बदल झाला होता. ती कोणाशीच बोलत नव्हती. निराशेत गेलेल्या गॉमिनीने अन्न-पाणी त्यागले होते. तिच्या वागण्यामुळे घरातील मंडळी चिंतेत होते. तिची आई विजयालक्ष्मी शिक्षिका असून वडील चिक्कास्वामी ड्रायव्हर आहेत.  गॅमिनीला खुश करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी खुप प्रयत्न केले.


तिच्यासाठी गेल्या आठवड्यातच त्यांनी नवा कुत्रा आणला होता. त्याचंही नाव जिमी ठेवलं. पण तरीही गॅमिनी डिप्रेशनमधून बाहेर आली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं, असं गॅमिनीची आई विजयालक्ष्मी यांनी पोलिसांना सांगितलं.  या धक्क्यातून न सावरता आल्याने गॅमिनी हिने अश्वथ नगरमधील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. 


खास मैत्रिणीचीही आत्महत्या


गॅमिनी हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने तिच्या आई-वडिलांना धक्का बसला. पण दरम्यान अजून एक दुर्देवी घटना समोर आली.  गॅमिनिच्या खास मैत्रिणीला हे वृत्त कळाले. त्यानंतर काही तासांनी या खास मैत्रिणीने बिन्नी मील्सजवळ ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.