Viral Video : आपल्याकडे लग्नात किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी गाणी आणि डान्स याशिवाय तो कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय वाटत नाही. भारतातील लग्न तर नृत्याशिवाय पूर्ण होत नाहीत. पण तुम्ही कधी कोणाच्या शोकसभेत कोणाला नाचताना आणि गाताना पाहिलं आहे का? होय, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. एका शोकसभेत (Condolence) एक महिला बॉलिवुडच्या गाण्यावर नाचताना दिसून आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे. विवाहसोहळ्यात जशा प्रकारचे नृत्य केले जाते अगदी तसाच काहीसा प्रकार या शोकसभेत पाहायला मिळाला आहे. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत माहिती नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूट्यूबवरचा हा व्हिडिओ एका वृद्ध व्यक्तीच्या शोकसभेचा आहे. या शोकसभेत लग्नासारखा स्टेज देखील उभारण्यात आला आहे. शोकसभेसाठी मोठ्या हॉलमध्ये स्टेजसमोर पांढऱ्या कपड्यांनी झाकलेल्या खुर्च्या देखील ठेवण्यात आल्या आहेत. तिथे बसून नातेवाईक शोकसभा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र त्याआधीच शोकसभेच्या स्टेजवर एक महिला नाचताना दिसत आहे. पिवळा लेहेंगा घातलेली ही मुलगी 'ले ले रे मजा ले' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये महिलेचा डान्स रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरामन व्हिडिओ कॅमेरा घेऊन तिच्याभोवती फिरताना दिसत आहे.



मृत व्यक्तीच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल


सोशल मीडियावर या शोकसभेचा व्हिडीओ पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओला, 'तुम्ही कधी अशी शोकसभा पाहिली आहे का, आम्हाला त्यांना खरोखरच श्रद्धांजली वाहायची आहे,' असे कॅप्शन दिलं आहे. लोकांनीही अशी शोकसभा कधीच पाहिली नाही असे म्हटलं आहे. एका युजरने, 'मृत व्यक्तीच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल,' असे म्हटलं आहे.


दरम्यान, बिहारमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला होता. बिहारच्या जमुई येथे श्राद्धाच्या कार्यक्रमादरम्यान लोक बार गर्ल्ससोबत अश्लील गाण्यांवर डान्स करताना दिसले होते. एका वृद्ध महिलेच्या श्राद्धप्रसंगी आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेचा हा व्हिडीओ होता. जमुईच्या महिसौरी भागात श्राद्ध कार्यक्रमादरम्यान श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. गीत, संगीत आणि भजन-कीर्तनाचा कार्यक्रमही झाला. सुरवातीला रंगमंचावर भक्तिसंगीत वाजवले गेले. पण नंतर अश्लील गाणी वाजायला लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये श्रद्धांजली सभेदरम्यान काही स्थानिक तरुण आणि बार गर्ल्स स्टेजवर अश्लील गाण्यांवर जोरदार नाचत आहेत.