Omg!थोडक्यात वाचली तरुणी; पाहा Video
त्यामुळे जिममध्ये व्यायाम करताना लक्षपूर्वक करा.
Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे यूजर्सचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात.तुम्ही सोशल मीडियावर जिममधील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर जिममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
तुम्ही तर असं करत नाही ना?
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता तीन मुली ट्रेडमिलवर चालत आहेत. या तिघी मुली ट्रेडमिलवर चालत असताना एकमेकींशी गप्पा मारत आहेत. या तीन मुलींपैकी एक मुलगी गप्पांमध्ये हरवून जाते. तिच्या लक्षात पण आलं नाही की ट्रेडमिलवर चालत असताना तिने हातही सोडून टाकला. अशात मुलीचा अचानक तोल जातो आणि ती खाली पडते. या दुर्घटनेत ती स्वत:ला कसेतरी सावरते आणि परत ट्रेडमिलवर चालायला लागते. (girl in gym funny video omg video girl did silly mistake in gym viral video in social media in marathi)
या व्हिडीओमध्ये मजेदार गोष्ट म्हणजे जणू काही घडलंच नाही, असा आव ही मुलगी आणते. जर त्या तरुणीने तोल सावरला नसता तर तिला जोरदार मार बसला असता. या तरुणीची ही चूक तिला महागात पडली असती. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करताना लक्षपूर्वक करा.
हा मजेदार व्हिडीओ इंस्टाग्रामवर ghantaa या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1.25 लाखांहून अधिक लाइक मिळाले आहेत.