मुंबई : आपल्याल तर हे माहित आहे की, हल्ली प्रसिद्धीसाठी तरुण-तरुणी काहीही करायला तयार होतात. त्यांच्यासाठी प्रसिद्धी आणि जास्तीत जास्त फॉलोअर्स या गोष्टी महत्वाच्या असतात. मग यासाठी ते आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत. असं काहीसं एका मुलीनं देखील केलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्कं सापाच्या तोंडाजवळ जाऊन त्याला किस करत आहे. तिने हा प्रकार एकदा नाही तर चक्कं दोनदा केला. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही तुमचं श्वास रोखून पाहू लागाल, परंतु या मुलीला मात्र या गोष्टीचं गांभिर्य कदाचित नसावं. आता तिच्या या प्रकाराला धाडस म्हणावं की मुर्खपणा हे तुमचं तुम्ही ठरवा.


साप हा पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. आजूबाजूला साप भल्याभल्यांना घाम फुटतो, परंतु या तरुणीने तर त्याचा चक्कं मुका घेतला. साप शांत दिसत असला तरी, तो कधी हल्ला करेल याचा काही नेम नाही.


काही साप तर इतके विषारी असतात की, त्यांच्या चाव्यामुळे माणसाचे जागीच प्राण जाऊ शकते. परंतु ही मुलगी तर जराही घाबरली नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सला चांगलाच धक्का बसला आहे. आता या मुलीनं असं का केलं याचं कारण तर समोर अलेलं नाही. परंतु व्हिडीओ पाहून तो प्रसिद्धीसाठीच व्हिडीओ केला गेला असावा. याची शक्यता काही नाकारता येत नाही.


हा व्हिडीओ rasal_viper नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.