Girl Escapes from Boyfriend: प्रेम हे आंधळ असतं असं म्हणतात. परंतु इतकं आंधळं असतं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. आसाम भागात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा घडलेला प्रकार ऐकून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही(girl safes herself from a difficult situation goes home safely viral news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममधील कचार जिल्ह्यात 16 वर्षीय तरुणीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, संशयित तरुणी दुसऱ्या कोणासोबत दुर्गापूजा पंडालमध्ये गेल्याने प्रियकर तिच्यावर रागावला होता.


तिच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यानुसार, संशयिताने तिला गंभीर इजा करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पिशवीत भरले आणि बॅग जंगलात फेकून दिली. पण या हल्ल्यातून ती वाचली आणि स्वतःची सुटका करून घरी परतली. तिचे कपडे फाटले होते. आता ती या धक्क्यातून सावरते आहे असं तिच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले.


समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय तेली हा कचार जिल्ह्यातील चहाच्या बागेत कामगार होता. पीडित मुलगी 3 ऑक्टोबरला दुर्गापूजेसाठी गेली होती आणि घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी ती घरी परतली आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले.


संशयितानं यापुर्वीही पीडित मुलीला इजा करण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.