ऐसे कैसे चलेगा दीदी! उभ्या ट्रकला स्कूटीसह ठोकली, क्लिनर सुद्धा घाबरला; पाहा Funny Video
Girl Hit Scooty On Truck Video Viral: देशातील मुली आणि स्त्रियांमध्ये स्कूटीची प्रचंड क्रेझ आहे. सायकलप्रमाणे स्कूटी चालवायला सोपी असल्याने मुली या गाडीला प्राधान्य देतात. गाडी चालवताना बॅलेन्ससोबत नुसतं एक्सलेटर द्यावं लागतं. पण असं असलं तरी सोशल मीडियावर मुलींचं स्कूटी चालवणं त्यावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Girl Hit Scooty On Truck Video Viral: देशातील मुली आणि स्त्रियांमध्ये स्कूटीची प्रचंड क्रेझ आहे. सायकलप्रमाणे स्कूटी चालवायला सोपी असल्याने मुली या गाडीला प्राधान्य देतात. गाडी चालवताना बॅलेन्ससोबत नुसतं एक्सलेटर द्यावं लागतं. पण असं असलं तरी सोशल मीडियावर मुलींचं स्कूटी चालवणं त्यावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक देते. सुनील पवार नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तिची चालवण्याची स्टाईल पाहून खाली उतरलेला क्लिनरदेखील घाबरला. व्हिडीओ शेअर (Funny Viral Video) करताना कॅप्शनमध्ये 'पापा की परी' असं लिहिलं आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की रस्त्यावर एक पिवळ्या रंगाचा ट्रक उभा आहे. रस्त्यावर रेती ओतण्यासाठी मधोमध ट्रक उभा केलेला दिसत आहे. त्यानंतर क्लिनर खाली उतरतो आणि आजूबाजूला पाहतो. ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा असला तरी दोन्ही बाजूने येणारे लोक मात्र बाजूने आरामात निघून जात आहेत. इतक्यात ट्रकमागून एक मुलगी स्कूटी घेऊन येते. अचानक तिची स्कूटी युटर्न घेते आणि ट्रकला धडकते.
13 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'ट्रकला बाजूला करण्याचा प्रयत्न फसला.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'ती आता बोलेल ट्रक बघून चालवू शकत नाही का?' तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'सर्व चुकी ट्रक चालकाची आहे.'