मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. हे फोटो आणि व्हिडिओ प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात.त्यामुळे या फोटो आणि व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगत असते. आता असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. नेमकं या फोटोंमध्ये असे काय आहे, हे जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदर्य हे गरीब (Poor family) किंवा श्रीमंताच (Rich Family) घर पाहून येत नसते. ते आपसुकच येत असतं. याचच उदाहरण आहे ही घटना. कारण या घटनेत एका सौदर्यवती तरूणीचा गरीब कुटूंबात जन्म घेतला आहे. या तरूणीचे फोटो (Photo) पाहून तुम्हाला तिचा खरंच गरीब कुटुंबात जन्म झालाय का? यावर तुमचा विश्वास बसणार नाही आहे. तसेच ही तरूणी चर्चेत आली तरी कशी असा साहजिक प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचेच उत्तर जाणून घेऊय़ात. 


फोटो व्हायरल कसे झाले?


सोशल मीडिया (Social Media) सध्या असे एक माध्यम बनले आहे, ज्यावर कोणीही रातोरात स्टार बनतो. एकाच रात्रीच एक व्हिडिओ अथवा फोटो त्या व्यक्तींचे आयुष्य बदलून टाकतो. या सोशल मीडियावर फेमस होणाऱ्या व्यक्तींना सोशल मीडिया सेन्सेशन (Social media sensation) देखील म्हटले जाते.अशाच एका रस्त्यावर फुगे विकणाऱ्या तरूणीचे (Balloon seller girl) फोटो एका फोटोग्राफरने (Photographer) सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो नेटकऱ्यांच्या खुप पसंतीस उतरले होते. त्यामुळे तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आले होते.


कोण आहे ती तरूणी?


अर्जुन कृष्णन नावाच्या एका फोटोग्राफरने (Photographer) रस्त्यावर फुगे विकताना एका तरूणीला (Balloon seller girl) पाहिले होते. ही तरूणी खुपच गरीब वाटत होती. पोटा पाण्यासाठी ती रस्त्यावर फुगे विकताना (Balloon seller girl) त्याच्या नजरेस पडली होती. या तरूणीला पाहताच फोटोग्राफर अर्जुन कृष्णनने तिचे फोटो काढले होते. हे फोटो काढल्यानंतर त्याने त्या तरूणीला म्हणजेच किसबू आणि तिच्या आईला दाखवले. किसबूचे हे सुंदर फोटो पाहून किसबू आणि तिची आई खूप खुश झाली. त्यानंतर फोटोग्राफरने ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंची आता सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. 



फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेकांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सही केल्या. यानंतर अर्जुनचा मित्र श्रेयसने देखील तिचे काही फोटो काढले. मात्र यावेळेस तिचे मेकओव्हर करून फोटो काढण्यात आले होते. हे तिचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. या फोटोंना देखील तुफान लाईक्स आणि कमेंटस आल्या होत्या. दरम्यान हे दोन्ही फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण पहिल्या फोटोमध्ये ती फुगे विकणारी (Balloon seller girl) गरीब कुटूंबातील तरूणी दिसत होती, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती एका श्रीमंताच्या घरातली तरूणी वाटत होती. त्यामुळे तिचे हे फोटो पाहुन नेटकरी सभ्रमात पडले होते.


केरळमधली ही घटना आहे. या तरूणीचे फोटो व्हायरल होताच आता ती सोशल मीडिया स्टार (Social Media) बनली आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.