नवी दिल्ली : महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.


धक्कादायक प्रकार उघडकीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात राहणाऱ्या २४ वर्षीय मुलीला ५५ हजार रुपयांत शाजापुर जिल्ह्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


मदतीसाठी आई-वडिलांची वणवण


पीडित तरुणीचे आई-वडील गेल्या सहा महिन्यांपासून बैतूलमध्ये आपल्या मुलीसाठी जिल्हाधिकारी आणि एसपींकडे मदत मागत आहेत मात्र, त्यांचं कुणीही एक ऐकल नाही.


पीडित तरुणीचा फोन बंद


मिळालेल्या माहितीनुसार, बैतूल जिल्ह्यात राहणारी २४ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत काम करण्यासाठी रजनी नावाच्या महिलेसोबत पुण्याला गेली. त्या ठिकाणी काही दिवस राहील्यानंतर दुसरं काम करण्यासाठी पीडित तरुणीला आरोपी रजनीने शाजापुर येथे घेऊन गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर पीडित तरुणीचा मोबाईल बंद झाला आणि तिच्या आई-वडीलांना संशय आला.


५५ हजारांत केली विक्री


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रजनीने या तरुणीला ५५ हजार रुपायांत दोन दलालांच्या माध्यमातून रवि भामी नावाच्या व्यक्तीला विक्री केली. रविने या तरुणीसोबत लग्नही केलं. आरोपीने या तरुणीला ५५ हजार रुपयांत खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. रवि आणि त्याचे नातेवाईक पीडित तरुणीचं शोषण करत असत, तिला घरातून बाहेर निघून देत नव्हते अशी माहितीही समोर आली आहे.


पोलिसांनी केली सुटका


मुलीच्या आई-वडीलांनी शाजापुर पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका करत ६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.