India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधूनच आणखी एका पाकिस्तानी महिलेचे प्रकरण समोर आले आहे. या महिलेला जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले आहे. मूळची पाकिस्तानी असल्याचा दावा या महिलेने केला आहे. ती भारतात तीन वर्षे राहत होती. आता तिला पाकिस्तानला जायचे आहे, असे तपासात निष्पन्न झाले.


ही महिला विस्तारा एअरलाइन्सच्या काउंटरवर पाकिस्तानला जाण्याबाबत चौकशी करत होती. दरम्यान, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना महिलेबद्दल संशय आल्याने त्यांनी सीआयएसएफला यासंदर्भात माहिती दिली. यानंतर पुन्हा गदारोळ झाला. ही बातमी समजताच संपूर्ण इंटेलिजन्स युनिट यंत्रणेत खळबळ उडाली. 


सध्या या महिलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफने ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. सीआयएसएफने तिची प्राथमिक चौकशी केल्यानंतर तिला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


महिलेची चौकशी करण्यासाठी आयबी, राजस्थान इंटेलिजन्स, बॉर्डर इंटेलिजन्सचे अधिकारी पोहोचले आहेत. या महिलेसोबत आणखी दोनजण असल्याची माहिती आहे. जयपूर विमानतळावरून पाकिस्तानला विमानसेवा उपलब्ध नसताना ती जयपूर विमानतळावर जाण्यासाठी का पोहोचली? तसेच तिच्याकडे कागदपत्रेच नव्हती मग तिला ही ओळख कशी मिळाली? असे दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. 


लाहोरहून श्रीमाधोपूरमध्ये आली 


सध्या ही मुलगी आणि ती तीन वर्षांपासून मावशीकडे राहत असल्याची माहिती समोर येत आहे. तिच्या मावशीचे घर श्रीमाधोपूरला आहे. ती बसमध्ये बसून सीकरहून जयपूरला आली होती. मावशीला न सांगता ती पाकिस्तानला निघून गेली होती, अशी माहिती तपासादरम्यान मिळाली आहे. 


पोलीस सध्या तरुणीची चौकशी करत आहेत. यामध्ये त्यांना अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तिच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे नाही. तसेच तरुणीला विमानतळावर कुणी आणलं? त्याचीही चौकशी सुरू आहे. मावशीसोबत तिचे वाद झाल्याचे समोर येत आहे. काकूने तीन वर्षांपूर्वी मुलीला लाहोरहून आणले होते, असेही समोर येत आहे.