Girlfriend Blocking On Social Media : कोणत्याही नात्यात एकमेकांना समजून घेणे आणि विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते. जोडीदाराच्या आवडी-निवडीची काळजी घेणे ही देखील नाती जपण्याची एकप्रकारे कलाच आहे. पण कधी कधी अशी चूक घडते, ज्यामुळे आपल्या जोडीदाराला वाईट वाटते तो आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. सध्याच्या काळात असं काही झालं तर थेट ब्लॉक (Block) केले जाते. नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडीदार एकमेकांवर खूप प्रेम करतात. पण जेव्हा नातं जुनं व्हायला लागतं तेव्हा असं वाटतं की आता आपला जोडीदार आपल्याला नीट समजून घेत नाहीये. काही वेळा जोडीदार वेळ देऊ शकत नसल्याने आपल्यासोबत टाईमपास झाल्याचे त्यांना वाटते. त्यामुळे अनेकदा मुलीने व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मुलाला ब्लॉक केल्याचे तुम्ही ऐकले असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रागाच्या भरात चढला मोबाईल टॉवरवर 


अशाच एक प्रेयसीने आपल्या प्रियकराला ब्लॉक केले. मात्र यानंतर हा माथेफिरु प्रियकर ब्लॉक काढण्यासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला. राजस्थानमधील भिलवाडा येथे गर्लफ्रेंडने नंबर ब्लॉक केल्यावर तरुण रागाच्या भरात मोबाईल टॉवरवर चढला. माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तरुणाचे त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलणं करुन दिले. त्यानंतर तो तरुण खाली उतरला. यानंतर पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक केली आहे.


खाली उतरताच केली अटक


हा तरुण जवळपास दीड तास मोबाईल टॉवरवर चढून बसला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची समजूत काढत त्याला खाली उतरवले आणि त्याला अटक केली. दुसरीकडे मुलीच्या वडिलांनी हा तरुण त्रास देत असल्याची तक्रार दिली आहे. काही कारणांमुळे नाराज झालेल्या प्रेयसीने तरुणाला ब्लॉक केले होते. यानंतर नाराज झालेला प्रियकर मोबाईल टॉवरवर चढला आणि प्रेयसीला समोर आणण्याची मागणी करु लागला. 


प्रेयसीला व्हिडीओ कॉल लावून दिला


लोकांनी यानंतर मोबाईल टॉवरखाली एकच गर्दी केली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाची खूप वेळ समजूत काढण्यात आली मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. यानंतर पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला व्हिडीओ कॉल लावून दिला. यानंतर तो तरुण खाली उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.