लव्ह, सेक्स और धोखा! गर्लफ्रेंडने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर कळलं बाळ दुसऱ्याचं, त्यानंतर बॉयफ्रेंडने केलं असं काही
Viral Video : इन्स्टाग्रामवर लव्ह, सेक्स आणि धोखा यावर एक स्टोरी व्हायरल होते आहे. जिच्यावर प्रेम केलं तिने गोंड बाळाला जन्म दिला. पण ते बाळ त्याचं नसून...
Instagram Viral Video : प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेमात ना वयाची ना धर्माची कसलीच मर्यादा नसते. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत अख्ख आयुष्यात घालवता आलं तर यापेक्षा जास्त मोठं सुख नाही. पण हिच व्यक्ती जेव्हा आपल्याला विश्वासघात करते तेव्हा आयुष्य आणि प्रेमावरील विश्वास हरपतो. सोशल मीडियावर अशीच एक धक्कादायक प्रेम कहाणी व्हायरल होते आहे. त्या तरुणाची कहाणी ऐकून हृदय पिळवटून टाकते. (Girlfriend Boyfriend Love and Cheating girlfriend gave birth to a cute baby but baby is someone elses Instagram Emotional story video )
लव्ह, सेक्स और धोखा!
या कहाणीमध्ये त्या तरुणाने सांगितलं की, गर्लफ्रेंडसोबत काही दिवस डेट केल्यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सगळं कशी सुंदर आणि आनंदी होतं. एक दिवस माझ्या गर्लफ्रेंडला संशय आला की ती प्रेग्नेंट आहे. मग ते डॉक्टरकडे गेले तर तिची तपासणी केल्यावर त्यांनी सांगितलं की, ती 4 महिने प्रेग्नेंट आहे. आता काय करायचं, गर्लफ्रेंडला ते बाळ ठेवायचं होतं. मीही तिच्या या निर्णयाचा सन्मान केला.
त्याने गर्लफ्रेंडला सांगितलं की, मी तुला कुठल्याही परिस्थितीत साथ देणार आहे. जर तुझी हरकत नसेल तर आपण दोघे लग्न करुयात. त्यानंतर लवकरच आमच्या घरात छोटीशी सुंदर राजकुमारी आलं. तिचं नाव आम्ही एल्व असं ठेवलं. त्या चिमुकलीच्या आगमनानंतर घरात आनंदी वातावरण होतं. पण तिची आई म्हणजे माझी गर्लफ्रेंड विचित्र वागत होती. तिच्या या वागण्यामागील कारणं कळतं नव्हतं.
मनात अनेक शंका येत होत्या. तिचं वागण दिवसेंदिवसे खराब होतं होतं. मग मला कळलं तिचं अनेक अफेयर्स आहेत. हे कळल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या सुखी संसाराला तडा गेला. मला कळलं होतं आपल्यासोबत विश्वासघात झाला. पण मुलीमुळे तिला सोडणं मला योग्य वाटलं नाही.
एक दिवस तिने मला एका तरुणाशी ओळख करुन दिली आणि म्हणाली मी या तरुणाशी लग्न करणार आहे. त्या तरुणाशी लग्न करताना तिला एल्व नको होती. कारण एल्वच्या असल्याने तिच्या चारित्र्यावर संशय आला असता. त्या दोघींनी एल्वला एका अनाथ आश्रमात देण्याचा निर्णय घेतला. मी एल्वला भेटू नये म्हणून त्यांनी मला पैसे देण्याचा प्रयत्न केला. पण मला एल्वाचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. तिच्या भविष्याची चिंता मला सतत त्रास देते होती.
मग मी ठरवलं आता एल्व माझ्यासोबत राहणार आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तिच्या कस्टडीसाठी मी कोर्टात गेलो. तिची कस्टडी मिळवण्यासाठी मला तब्बल एक वर्षांचा संघर्ष करावा लागला. आज माझी मुलगी 3.5 वर्षांची आहे आणि मला तिचा बाप असल्याचा अभिमान आहे.
ही स्टोरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील kahaniyan poiandv cube या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर ही स्टोरी सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे.