UP News: प्रेमाला देशांच्या सीमेच्या मर्यादा नसतात. गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोणी आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आले तर कोणी भारतातून पाकिस्तानात गेले. सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील प्रियकराला भेटण्यासाठी, त्याच्याशी लग्न करण्यासाठी प्रेयसी दुबईहून भारतात आली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे तिच्या प्रियकराचे घर होते. ही तरुणी मूळची पंजाबमधील जालंधर येथील होती. इथे आल्यावर तिला प्रियकराच्या घरी वेगळे वातावरण पाहायला मिळाले. मुलाच्या घरची मंडळी घराला कुलूप लावून पळून गेल्याचे तिच्या लक्षात आले. पण तिने हार मानली नाही. ती सलग 10 दिवस घरच्या व्हरांड्यात बसून होती.


प्रियकराच्या घरच्या वऱ्हांड्यात बसलेल्या तरुणीला गुरुवारी सायंकाळी उशिरा चारचाकी वाहनातून आलेल्या काही लोकांनी पळवून नेले. तिला बळजबरीने नेण्यात आल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. मुलीला तिच्या मोबाईलवर कॉल करण्याचाही प्रयत्न केला, मात्र फोन बंद असल्याचे आढळले. स्थानिक दुबौलिया पोलीस स्थानकाचे प्रभारी एसओ सुरेंद्र कुमार यांनी याबद्दल माहिती दिली. 


दरम्यान 27 वर्षीय तरुणीने रामनगर गावातील तरुणावर गंभीर आरोप केले.  ती तीन वर्षांपासून दुबईत राहते आणि स्वयंपाकाचे काम करते. यूपीतील रामनगर गावातील रहिवासी राजकुमार याच्याशी तिची ओळख झाली होती. लग्नाच्या बहाण्याने राजकुमार माझ्यासोबत पती-पत्नीसारखे राहू लागला, असा तिचा आरोप आहे. तेथे त्याने लग्न परदेशात होऊ शकत नाही, त्यामुळे आपण मायदेशी जाऊ, असे सांगत त्याने फसवल्याचा आरोप त्याने केला.


प्रियकराने मला फोन करून 30 ऑक्टोबरला लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. पण 29 ऑक्टोबरलाच राज कुमार कुटुंबीयांसह घराला कुलूप लावून फरार झाला. प्रियकराकडून लग्नासाठी 10 लाख रुपये आणि कारची मागणी होत होती, असे तिचे म्हणणे आहे.