Crime News Today: प्रसिद्ध कॉरिओग्राफर केशव नवारिया यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नवारिया जयपूर येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी केशव याच्या आत्महत्याप्रकरणात सखोल तपास करत आहेत. त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक रहस्ये समोर येत आहेत. अलीकडेच केशवच्या मोबाइलमधील गुगल सर्च हिस्ट्रीतून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी केशव नवारियाच्या फोनची गुगल हिस्ट्री चेक केल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवने आत्महत्या करण्यापू्र्वी गर्लफ्रेंडपासून सुटका कशी करावी, असं सर्च केले होते. तसंच, त्याचे उपायही गुगलचा विचारले होते. गर्लफ्रेंड ब्लॅकमेल करतेय, काय करु?, यासारखे प्रश्न विचारले होते. यामुळं आता या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. 


जयपूरच्या रामगंज येथे राहणाऱ्या 25 वर्षीय पुष्पेंद्र र्फ केशवने 20 जुलैरोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी त्याचे कुटुंबीय घराबाहेर गेले होते. ते जेव्हा परत आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून वाकून पाहिले तेव्हा मुलाला पंख्याला लटकलेले पाहिले. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. कोरिओग्राफर केशवची मनस्थिती ठिक नसल्याचे बोलले जात आहे. इतकंच नव्हे तर, त्याने फोनमध्ये प्रेयसीचे नाव लडाकू विमान असं सेव्ह केले होते. 


मयत मुलाचे वडील रोशनलाल यांनी मुलाच्या गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मुलाने तिच्यासमोर व्हिडिओकॉलवर आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारण त्याच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंडने केलेला व्हिडिओ कॉलचा पुरावा आहे. त्याआधारे त्यांनी गर्लफ्रेंडविरोधात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच, त्याच्या मोबाईलवर 30 मिस्डकॉल होते, 


केशवच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव कोरियोग्राफर होता. तर त्याच्याच ग्रुपमधील तरुणी त्याची प्रेयसी होती. तिच्याचमुळं आज माझा मुलगा या जगात नाहीये. ती त्याचा वाचवू शकली असती मात्र तिने जाणूनबुजून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. 


दरम्यान, केशवच्या आत्महत्येनंतर त्याची प्रेयसी रुग्णालयात दिसली होती. मात्र त्यानंतर ती कुठे कुठेच दिसली नाही. जयपूर पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तर, एकीकडे केशवच्या वडिलांच्या आरोपानंतर त्याची कथित प्रेयसीने समोर येत आरोप फेटाळले आहेत. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, मी आणि केशव पाच वर्षांपासून एकत्र आहोत. केशवच्या जाण्याने मी माझं प्रेम आणि होणारा साथीदार गमावला आहे. तो पैशांवरुन तो चिंतेत होता. त्याच्या मेहनतीचे पैसे तो मागत होता, मात्र कोणी ते त्याला देत नव्हते, असं तिने म्हटलं आहे.