Bulli Bai: GitHub : बुली बाई (Bulli Bai) नावाने गिटहब (GitHub)नावाच्या ऑनलाईन अॅपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात गटाकडून गिटहब अॅपवर मुस्लीम महिलांचे (Muslim Women) फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केलं जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवार, 1 जानेवारी 2022 रोजी बुली बाई नावाने अॅपवर फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितलं आहे
 
या अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले असून, त्याबरोबर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्या फोटोंचा लिलाव केला  जात आहे. यात एका महिला पत्रकाराचा फोटो अपलोड करण्यात आला असून आक्षेपार्ह मजकूरासह तो शेअर केला जात आहे.


प्रकरणाचा तीव्र पडसाद
या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहब वापरून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर अपलोड केले असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.  मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार करण्यात आली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.


यासंदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी लिहिलं आहे  'मी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रश्मी करंदीकर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. तसंच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचलाकांनाही मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. चुकीच्या सेक्सिस्ट साईटमागे जे आहेत ते लवकरच पकडले जातील.


मुंबई सायबर पोलिसांनी सुरु केला तपास 
मुंबई पोलिसांनी या याप्रकरणीच गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.


या अॅपमध्ये नाव असलेल्या एका मुस्लीम महिला पत्रकाराने सांगितलं की मुस्लिम महिलांसाठी नवीन वर्षाची सुरुवात भीती आणि द्वेषाच्या भावनांनी झाली आहे. गेल्या वर्षी 'सुल्ली डील्स' चा वाद झाला होता. यातही मुस्लीम महिलांच्या फोटोचा गैरवापर करण्यात आला होता. पण दोषींविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.