नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून भारतीय डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामेडिक्स यांनी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, या लोकांनी कोविड १९ संसर्गादरम्यांन लोकांची सेवा केली आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी हा उत्तम विचार आहे. तसेच मेडिकल क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या सर्वांसाठी ही खरी श्रद्धांजली ठरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  गरज पडल्यास नियमांमध्ये बदल करा
 केजरीवाल यांनी ट्वीट केले की, यावर्षी भारतीय चिकित्सकांना भारतरत्न द्यायला हवा. भारतीय चिकित्सकांचा अर्थ सर्व चिकित्सक, नर्स आणि पॅरामेडिक्स होय. शहिद झालेल्या डॉक्टरांनाही ही खरी श्रद्धांजली असेल. आपले प्राण आणि कुटूंबाची चिंता न करता सेवा करणाऱ्यांचा हा सन्मान असेल.



 
 सोबतच केजरीवाल यांनी पत्रात ही देखील मागणी केली की, हे नियमांच्या चौकटीत बसत नसेल तर, नियमांमध्ये बदल करावेत.