नवी दिल्ली : वाराणसीमधून पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवारी अर्ज भरणारे तेज बहादूर यादव यांच्या एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तेज बहादूर यादव पैशांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याबाबत बोलत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ शहजाद पुनावाला यांनी ट्विट केला आहे. हा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर तेज बहादूर यांनी यावर स्पष्टीकरण देखील दिलं. त्यांनी म्हटलं की, 'हा व्हिडिओ त्यांचाच आहे. हा व्हिडिओ मे-जून २०१७ च्या दरम्यानचा आहे. त्यावेळी निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नव्हती. भाजप याचा चुकीचा वापर करतो आहे.'


हा व्हिडिओ वाराणसी येथून तेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तेज बहादूर म्हणत आहे की, 'कोणी मला ५० कोटी दिले तर मी पंतप्रधान मोदींची गोळ्या घालून हत्या करेल.' हा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल झाल्यानंतर आता यावर आणखी वाद होण्याची शक्यता आहे.