Kangana Ranaut :  भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतने आपल्या मागणीने खळबळ उडवून दिली आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दाखल झालीआणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट मागणी केली. महाराष्ट्र सदनातल्या इतर रुम छोट्या असल्याने मुख्यमंत्र्यांचा सुट द्यावा अशी मागणी तीने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मिळावा यासाठी महाराष्ट्र सदनातूनच महाराष्ट्रातला एका बड्या नेत्याला फोन करुन खटपटही केल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा सुट देता येत नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदनने दिलंय. त्यामुळे महाराष्ट्र सदनात राहण्याचा निर्णय कंगना रनौत बदलणार असल्याची चर्चा आहे. कंगनाला एक खोली दाखवण्यात आली जी सामान्यतः राज्यातील एका मंत्र्याला दिली जाते. त्या खोलीला देखील तिने नकार दिला होता. 
कंगणाच्या या मागणीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत संजय राऊत यांनी कंगणावर निशाणा साधला आहे. 


बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडूनआल्याआहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचलभवनयेथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळतअसेलतर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहातआहेत श्रीमतीजी… अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. 


 



कॉन्स्टेबलने कंगणाच्या कानशिलात लगावली


नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत हिला कानशिलात लगावणा-या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. चंदिगड विमानतळावर महिला CISF कॉन्स्टेबलनं कंगनाच्या कानशिलात लगावली. कुलविंदर कौर असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनात लोकं शंभर रुपये घेऊन सहभागी झाल्याचं विधान या आंदोलनावेळी कंगना रनौतनं केलं होतं. त्या आंदोलनात आपली आई हक्कासाठी सहभागी झाली होती. मात्र वादग्रस्त विधानानं कंगनानं शेतकरी आंदोलनाचा अपमान केला होता. त्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं महिला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिनं सांगितलं. या प्रकरणी CISF अधिका-यांची समिती तिची चौकशी करणार आहे.